आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडू गायकवाड यांची आत्महत्या, आयुष्यभर गाडगेबाबांचा वेशभूषेत स्वच्छतेबाबत करत होते प्रबोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - ज्येष्ठ रंगकर्मी व कीर्तनकार खंडू शामराव गायकवाड ( ६५, रा. एन-१२ स्वामीविवेकानंद नगर ) यांनी बुधवारी आत्महत्या केली. दुपारी अडीच्या सुमारास हिमायत बागेजवळील रोपवाटिकेजवळ ते बेशुद्धावस्थेत अाढळले.  माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. विष प्राशन करून गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी दिसून येते.  असे असले तरी याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.   
 
विष प्राशन केल्यामुळे गायकवाड यांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले  असून यामागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. बुधवारी पाचच्या सुमारास त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.  
 
गायकवाड कुठल्या अडचणीत होते का, त्यांना काही मानसिक ताण होता का याबाबत त्यांचा मुलगा प्रशांत गायकवाड यांची विचारपूस केली, मात्र ते बोलण्याचा मन:स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अंत्यविधी झाल्यानंतर आम्ही याबाबत बोलू असे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. तक्रार येईल त्यानुसार गुन्हा दाखल करू, अशी माहिती पोलिस निरीक्षक वसीम हाश्मी यांनी दिली. पोलिस हवालदार शेख जहीर पुढील तपास करीत आहेत. खंडूजी गायकवाड देभेगाव (ता. कन्नड) येथील रहिवासी होते. १९७०मध्ये आदर्श कला पथकाची स्थापना केली. औरंगाबादेत आल्यानंतर त्यांना सेट्राँन कंपनीत नोकरी मिळाली होती. त्या वेळीच त्यांनी नाट्य मंडळाची स्थापना केली. ललित कला भवनाच्या उद््घाटनानिमित्त त्यांच्या ‘काका किशाचा’ या नाटकाचा प्रयोग झाला होता. त्यांनी दूरदर्शनवर ‘शिक्षणाविना अंधार’ हे लोकनाट्य, सोंगी भारूड सादर केले. 
 
१९७६ मध्ये त्यांचे नाटक पाहण्यासाठी कविवर्य वामनदादा कर्डक आले होते. त्या वेळी गायकवाड यांनी वामनदादांना संत गाडगेबाबा यांचे भारूड म्हणून दाखवले. ‘तू गाडगेबाबांसारखे कपडे घालून कार्यक्रम करत जा, असे वामनदादांनी त्यांना सांगितले. तेव्हापासून गायकवाड यांनी स्वच्छतेचे व्रत हाती घेतले. २०११ पासून घाटी हॉस्पिटलच्या परिसरातील गाडगे महाराज धर्माशाळा खंडुजी गायकवाड यांच्याकडे सोपवली. 
बातम्या आणखी आहेत...