आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पोलिसी कायदा, भारताने कसाबलाही वकील दिला; जाधवांच्या फाशीवर अॅड. निकम यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाकिस्तानात पोलिसी कायदा आहे. म्हणून पाकिस्तानने भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधवांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त नागसेनवन येथील पी.ई.एस अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ भगवान राव देशपांडे होते.  

भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधवांना काल (सोमवारी) पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याचा संदर्भ देत अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही आरोपी म्हणता येत नाही. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान असल्याने 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल अमीर कसाब विरोधात सर्व पुरावे असताना त्याच्या विरोधात ओपन ट्रायल झाले.  भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे त्याला एक नाही तर दोन-दोन वकील देण्यात आले. अॅड.उज्ज्वल निकम म्हणाले, "कसाबने केलेली पाकिस्तानी वकील मिळण्याची मागणी मान्य केली होती. पाक हायकमिश्नरने भारताच्या पत्रानंतरही कसाबला वकील नाकारला. पाकिस्तानने जाधवांच्या बाबतीत असे काहीही केले नाही. जाधव यांना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी देण्यात आली नाही. कारण तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नसून पोलिसी कायदा आहे.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...