आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: वेरूळ लेणीतील शिल्पांना गतवैभव, 50 वर्षांनी वाढणार आयुर्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वेरूळ लेणीतील शिल्पांना गतवैभव देण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या विज्ञान शाखेने (एएसआय) संवर्धनाचा मोठा प्रकल्प हाती घेतला. बेलफळ, बेल, हिरडा, डिंक, बेहडा यासारख्या १३ ते १४ वनस्पतींच्या लेपाने हे काम सुरू असून या कामामुळे लेणीचे आयुष्य ५० वर्षांनी वाढेल. दिवसाकाठी १० ते १२ तास काम सुरू असून ते पूर्ण होण्यास १० महिने लागतील. वेरूळच्या ३४ लेणी ६ ते ११ व्या शतकादरम्यान साकारल्या आहेत. विशेषत: ११, १६ आणि ३४ क्रमांकाच्या लेणीतील चित्रे प्रसिद्ध आहेत. मात्र, उखडलेले प्लास्टर आणि चित्रांचे उडालेले रंग पर्यटकांचा रसभंग करतात.    
 
आठव्या शतकातील साहित्याचा वापर  : आतील भिंतीतील निघालेला मातीचा थर परत बसवण्यासाठी काळी माती, गढीची पांढरी माती आणि तलावातील चिकणमातीचा वापर करून मड प्लास्टर केले जात आहे. मातीत बेलफळ, बेल, हिरडा, डिंक, बेहडा, तांदळाच्या साळीचा भुसा, घोड्याची लीद आणि शेण मिसळले जाते. पेंटिंगमागील चुन्याच्या थरात हवा गेल्याने ते फुगतात. त्यात गॅप निर्माण होतात. चुन्याचा थर भिंत सोडतो. तो परत बसवण्यासाठी एजिंग केले जाते. पॉलिव्हिनिल अॅसिटेट (पीव्हीए) आणि टॉलिनचे इंजेक्शन फुगलेल्या पापुद्र्यात सोडले जाते. यानंतर ते चिकटण्यासाठी रोलरने दाब दिला जातो.
 
 
पुढील स्लाईडवर पाहा,  अशा प्रकारे चालू आहे काम...