आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबाद: जिल्हाभरातील 70 टक्के दारू दुकाने होणार बंद, 26 फेब्रुवारी रोजी होणार शिक्कामोर्तब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आहे जालना रोड. याचा काही भाग हा राज्य महामार्गांत येतो. - Divya Marathi
हा आहे जालना रोड. याचा काही भाग हा राज्य महामार्गांत येतो.
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून ५०० मीटर अंतराच्या आत असणारे सर्व बार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग कामाला लागला आहे. डीबी स्टारने यासंबंधी खोलात जाऊन माहिती घेतली असता जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के दारू दुकानांना कुलूप लागणार आहे. नियमानुसार त्यांचे परवाने रद्द होणार आहेत. हा निर्णय घेताना कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क, राज्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह विविध सहा विभागांची जंबो बैठक होणार आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यात सर्व निकष लावून अगदी नियमानुसार कारवाई होईल. अर्थात, यामुळे उत्पादन शुल्क विभागाचा खिसा वर्षाकाठी १४ कोटीने रिकामा होण्याचा अंदाज आहे. 
 
मद्यसेवन करून रस्त्यावर वावरल्यामुळे दरवर्षी हजारो अपघात होतात. विशेषत: राज्य राष्ट्रीय महामार्गावर हे प्रमाण खूप आहे. त्यामुळे यासंदर्भातील एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाची एप्रिल २०१७ पासून देशभरात सर्वत्र अंमलबजावणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने शासनाने सर्व दारू दुकानांची माहिती मागवली आहे. 

सहाविभागांची बैठक 
या संदर्भातयेत्या २१ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विभागांची जंबो बैठक होत आहे. त्यात राज्या उत्पादन शुल्क, राज्य राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा परिषद आणि पीडब्ल्यूडी या सहा विभागांचा समावेश आहे. प्रत्येक बाब अगदी काटेकोरपणे तपासूनच त्यात प्रत्येक दारू दुकान बारचे मोजमाप केले जाणार आहे. 

बैठक नेमकी कशासाठी? 
जीदुकाने बाधित होतील त्यांचा पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. विविध विभागाचे अधिकारी कोणता रस्ता कोठून कोठे जातो तो कोणत्या प्रकारात मोडतो हे सांगेल. भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यासमक्ष त्याची मोजणीही करून देईल. २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व विभाग दुकानांच्या यादीप्रमाणे पाहणी करून अहवाल तयार करेल. त्यानंतर त्यांची यादी करून २७ फेब्रुवारी रोजी त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. याच दिवशी कोणत्या दुकांनाना दारू विक्रीचा परवाना द्यायचा नाही यावर निर्णय घेतला जाईल. 

तिजोरीलाफटका पण... 
सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशातील नेमकी काय स्थिती होईल याचा तपास केला असता अनेक बाबी समोर आल्या. देशभरात नॅशनल स्टेट हायवेवर सुमारे १३ हजार परमिट रुम वॉईनशॉप आहेत. या दुकानांच्या केवळ वार्षीक फी पोटी उत्पादन शुक्त मंत्रालयाला सुमारे हजार कोटीचा महसूल मिळतो. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ही दुकाने बंद झाल्यास तिजोरी रिकामी होईल. पण लोकांच्या जीवापुढे ही किंमत काहीही नाही. प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील राज्य सरकारने बी प्लॅन तयार केला आहे. यात शहरामधून जे राज्य महामार्ग जातात त्यांना जिल्हामार्ग करण्याची तयारी सुरू केली आहे. जर मुख्य शहरातील राज्य महामार्ग जिल्हा महामार्गांत वर्ग झाले तर सुमारे हजार दारू दुकाने वाचवण्यात यश येऊ शकते. कारण सर्वाच्च न्यायालयाचा निर्णय जिल्हा महामार्गांना लागू होत नाही. मात्र सरकारला ‘ये रास्ते नही आसान’ या म्हणीप्रमाणे जावे लागणार आहे. शहरातून जिल्हा मार्ग केल्यास त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थाना करावी लागणार आहे. शिवाय दारू दुकाने वाचवण्यासाठी कंगाल महानगर पालिकेवर बोजा टाकण्याचे उरफाटे काम मात्र अंगावर येऊ शकते. 

बैठकीतून स्थिती समोर येईल 
न्यायालयाच्या आदेशानुसारजे बार दारू दुकाने राज्य राष्ट्रीय महामार्गावर आहेत त्यांचा दारू विक्रीचा परवाना एप्रिलपासून रद्द होईल. जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल यात येत आहेत. शिवाय नेमके कोणते हॉटेल बाधित होणार हे कळावे यासाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. एस.के. राजपूत, उपअधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, औरंगाबाद 

जिल्ह्यात अशी आहे स्थिती 
औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादन शुल्कच्या नोंदींप्रमाणे ४२९ परमिट रूम, ११७ देशी दुकाने, ११२ बियर शॉपी ३१ वाइन शॉप आहेत. यातील ७० टक्के दुकाने राज्य राष्ट्रीय महामार्गांवर येतात. त्यामुळे ती बंद होतील. उत्पादन शुल्क विभागाला यातून विभागाला २० कोटी ८० लाख रुपये प्रतिवर्षी मिळतात, पण हा आकडा दुकाने बंद झाल्यानंतर कमी होऊन कोटींपर्यत येणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाला महसुलासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...