आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाख युनिट सरप्लसचा दावा, तरीही औरंगाबादेत भारनियमन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ८३ पैकी ५२ फीडरवर ३४ ते ७५ टक्क्यांपेक्षा अधिक वीज गळती होत आहे. जेथे गळतीचे प्रमाण प्रमाणाबाहेर गेले अशा जी ते जी मधील ३० फीडरवर सोमवारपासून (११ सप्टेंबर) सकाळी सायंकाळी तास भारनियमन सुरू करण्यात आले. आणखी २२ फीडर रडारवर आहेत. महावितरणने कोणतीही पूर्वसूचना देता भारनियमन सुरू केल्याने नियमित वीज बिलाचा भरणा करणाऱ्या हजारो ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात लाख युनिट सरप्लस वीजेचा दावा करण्यात येत असला तरी औरंगाबादेत भारनियमन सुरू झाले आहे. 
 
२०१२ नंतर आता पुन्हा शहरवासीयांना भारनियमनाला तोंड द्यावे लागणार आहे. विजेची उपलब्धता आणि मागणी याची सांगड घालण्यासाठी जेथे वीज गळतीचे प्रमाण जास्त तेथे भारनियमन करण्याचे आदेश महावितरणच्या लोड डिस्पॅच विभागाने सर्व मुख्य अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत. यात ग्रामीणसह शहरातील फीडरचाही समावेश आहे. औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असूनही येथे भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील ३० फीडरवर ५८ ते ७५ टक्क्यांवर वीज गळती सुरू आहे. राज्यात एवढी जास्त वीज गळती कुठेच नाही. त्यामुळे प्रथम टप्प्यात आपत्कालीन स्थितीत शहरात सकाळी ६.३० ते १०.३० दुपारी ३.३० ते ७.३० या वेळेत भारनियमन सुरू झाले आहे. 

वरिष्ठांच्या आदेशानुसार भारनियम : मागणीपुरवठ्याची सांगड घालण्यासाठी जेथे वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी भारनियमन करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. औरंगाबादेतील ५२ फीडरवर ४२ ते ७५ टक्क्यांवर वीज गळतीचे प्रमाण आहे. त्यापैकी ३० फीडरवर प्रथम सकाळी सायंकाळी दोन टप्प्यात भारनियमन सुरू केले आहे, अशी माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी दिली. 
 
वीजगळतीचे पुढे केले कारण : राज्यवीज नियामक आयोगाने सक्त आदेश देऊनही वीज गळती चोरी रोखण्यास महावितरण अपयशी ठरले आहे. शहर एक दोनमध्ये १०० पैकी ३४ ते ७४ टक्के वीज गळती होत आहे. सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास अशा महत्त्वाच्या वेळेत भारनियमन होत असल्याने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महावितरणचे दरमहा ५०० कोटी याप्रमाणे वर्षाला सहा हजार कोटींचे नुकसान होत आहे. वीज दरवाढ करून किंवा इन्फ्राच्या कामासाठी ग्राहकांकडून अधिभार वसूल केला जातो. याचा ग्राहकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. लहान-मोठे व्यवसाय बंद राहिल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होते. 
 
बातम्या आणखी आहेत...