आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरिपात लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींचे कर्जवाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- खरीप हंगामासाठी औरंगाबाद विभागातील लाख ३३ हजार ६२० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. ४०६१ कोटींचे खरीप कर्जवाटपाचे लक्ष असताना ४१८८ कोटी ३० लाखांचे कर्ज वाटप बँकांच्या वतीने करण्यात आले आहे. विभागात कर्जवाटपाचे प्रमाण १०३ टक्के आहे, तर रब्बीसाठीच्या कर्जवाटपाचे प्रमाण जानेवारीअखेर ४३ टक्के आहे.
 
औरंगाबाद विभागात औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे येतात. विभागाला खरिपाचे कर्जवाटपाचे उदिष्ट पूर्ण करण्यात यश आले आहे. यात सर्वाधिक कर्जवाटप औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. सलग चार वर्षे भयाण दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा जिद्दीने उभे राहत पेरणी केली. चांगल्या पावसामुळे भरघोस उत्पादनही झाले. त्यानंतर प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे खरीप हंगामात उद्दिष्टापेक्षा जास्त कर्जवाटप करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी कर्जवाटप सुरू असून जानेवारीअखेर ४३ टक्के कर्जवाटप झाले आहे.
 
राष्ट्रीयीकृत बँका पुढे : औरंगाबादविभागात कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी खरिपात लाख ९६ हजार १०२ शेतकऱ्यांना २८७९ कोटी ४४ लाख ( १०० टक्के) कर्जवाटप केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाख ५६ हजार ६८८ (१०४ टक्के) शेतकऱ्यांना ७२७ कोटी ९६ लाखांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेच्या माध्यमातून ८० हजार ८३० शेतकऱ्यांना (११३ टक्के) ५८० कोटी कर्जवाटप करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात ६५७ कोटी लाख हजार शेतकऱ्यांना (६७ टक्के) कर्जवाटप झाले आहे, तर परभणी जिल्ह्यात लाख ४९ हजार शेतकऱ्यांना १४०५ कोटींचे (१०७ टक्के) कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच जालना जिल्ह्यात लाख ७४ हजार शेतकऱ्यांना १२११ कोटींचे (१०८ टक्के) कर्जवाटप करण्यात आले आहे. 

रब्बीत ४३ % वाटप 
औरंगाबादविभागात रब्बीसाठी १२४७ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ते पूर्ण करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत चारही जिल्ह्यांतील ५९८६० शेतकऱ्यांना ५४० कोटी ५८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. हे प्रमाण ४३ टक्के आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक कर्जवाटप 
औरंगाबादजिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामासाठी १२८१ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. खरिपासाठी ६७२ कोटी, तर रब्बीसाठी ६०९ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरिपासाठी जिल्ह्यातील दोन लाख ४३३ शेतकऱ्यांना ९१३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. फेब्रुवारीपर्यंत २५,३२९ शेतकऱ्यांना रब्बीसाठी २५५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११६९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे.