आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छुकांच्या गाठीभेटी; कार्यकर्ते तयारीला, खुलताबादेतील २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या ४ ऑगस्ट रोजी होत आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक रिंगणात उभे राहण्यासाठी चढाओढ लागली आहे. त्यातच आजी, माजी सरपंच, सदस्य कामाला लागले आहे. इच्छुक उमेदवार स्थानिक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

खुलताबाद तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ ऑगस्ट रोजी होत आहे, तर उर्वरित १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दोन वर्षांपासून झाल्या आहेत. आता वेरूळ, खांडीपिंपळगाव, राजेराय टाकळी, कसाबखेडा, सुलतानपूर, भडजी, गल्लेबोरगाव, वडोद बु., मावसाळा, गदाना, धामणगाव, बाजारसावंगी, खिर्डी, म्हैसमाळ, गोळेगाव, कनकशिळ, इंदापूर, सोनखेडा, सराई, पळसवाडी, निरगुडी, ताजनापूर, बोडखा, झरी, वडगाव, पिंप्री, कागजीपुरा या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. या गावात ग्रामपंचायतींची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी आता मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे गावस्तरावर ग्रामपंचायत निवडणुकीचे चांगलेच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीमुळे यंदा खुलताबाद तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकामध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ग्रामीण भागात उत्साह बघावयास मिळत आहे.
निवडणूक कार्यक्रम
१३ ते २० जुलैपर्यंत नामनिर्देशन अर्ज सादर करणे. मात्र, १८ व १९ जुलैला सु्ट्या आल्या आहेत. २१ जुलै नामनिर्देशन पत्राची छाननी होईल, २३ जुलैला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. याच दिवशी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. यासाठी ४ ऑगस्टला मतदान होईल. मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान होईल. ६ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल. परंतु मतदारांनी आपले आधारकार्ड मतदान कार्डाशी संलग्न करण्यासाठी बीएलओकडे द्यावे, असे आवाहन तहसीलदार सचिन घागरे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...