आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लव्ह मॅरेज’ केल्याने तरुणीच्या नातेवाइकांनी मुलाला पाजले विष, औरंगाबादमधील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुतणीने प्रेमविवाह केलेल्या मुलाला रस्त्यात अडवून विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार १३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता ब्रिजवाडी भागात घडला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गंगाधर सोनवणे (२५, रा. ब्रिजवाडी) याने आरोपींच्या पुतणीसोबत लग्न केले आहे. 
 
विकास १३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घरी जात होता. दरम्यान, त्याला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. विश्वंभर भालेराव संतोष शिंदे यांनी विकासला पकडून विषाची बाटली त्याच्या ताेंडात ओतली आणि फरार झाले. त्यानंतर विकासला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विश्वंभर भालेराव, प्रकाश भालेराव, पंढरी भालेराव, संतोष शिंदे यासह अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...