आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलताबादचे प्रेमीयुगुल सापडले जळगावात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - जळगाव शहर पोलिसांनी खुलताबाद येथील प्रेमीयुगुलाला शुक्रवारी पहाटे ५ वाजता जळगावातून ताब्यात घेतले. मुळचे वेरूळ येथे राहणारे हे प्रेमीयुगुल एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत असून ते पाच दिवसांपूर्वी खुलताबाद येथून पसार झाले. दोघांची वय २३ वर्षे आहे. हे दोघे पळून गेल्यानंतर खुलताबाद पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली. हे दोघे जळगावातील एका मित्राकडे राहायला होते. दरम्यान, दोघांच्या मोबाइल क्रमांकावरून त्यांचे लोकेशन पोलिसांनी ट्रेस केले होते. 

शुक्रवारी रात्री ११ वाजता खुलताबाद पाेलिसांनी जळगाव शहर पोलिस ठाण्यात फोन वरून माहिती दिली. हे प्रेमीयुगुल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गणेश शिरसाळे व दुष्यंत खैरनार या दोघांनी शोध घेतला. भारतनगर येथील एका घरातून या प्रेमीयुगुलाला पहाटे ५ वाजता ताब्यात घेतले. तोपर्यंत खुलताबाद पोलिसही जळगावात पोहोचले होते. दोघांना ताब्यात घेऊन आधी शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. नोंद घेतल्यानंतर सकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिस दोघांना घेऊन खुलताबादकडे रवाना झाले.