आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावातच होणार मोबाइल चार्जिंग, गिरण्या सुरू; महावितरणला आली जाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधारी- सिल्लोड तालुक्यातील  अंधारी गावात नवीन १६ रोहित्र बसवण्यात आले  असून वीज आल्याने उत्साहाचे वातावरण आहे. दिव्य मराठीने अंधारी गाव अंधारात या अशयाचे सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. गावातील १८ पैकी १६ रोहित्र जळाले होते. आता गावात वीज आल्याने गावातच मोबाइल चार्जिंगची सोय झाली असून आता घराघरात अनेक दिवसांनंतर भाकरी करताना महिला दिसून आल्या.   


रविवारी अंधारी गावात व मुख्य बाजार पेठेत वीजपुरवठा सुरळीत होताच. छोटे-मोठे व्यापारी व गावकरी यांनी दिव्य मराठीचे आभार मानले.  गावात वीजपुरवठा नसल्याने शेजारील गावात जाऊन किंवा परगावच्या नातेवाइकांकडे जाऊन मोबाइल चार्ज करावा लागत होता. तर गावातील पीठाच्या गिरण्या बंद असल्याने सामान्यांच्या घरात भाकरीऐवजी खिचडीला पसंती देण्यात येत होती. आता वीजपुरवठा सुरळीत झाल्याने गावातील गिरण्या सुरू झाल्या आहे. गिरणीचालक नंदलाल वर्मा व काशीनाथ फड हे गरीब कुटुंबातील असून त्यांचा गिरणी व्यतिरिक्त कुठलाही जोड धंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. वारंवार होणाऱ्या खंडित पुरवठ्यामुळे व्यवसाय अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी सांगितले. आता अंधारी गावाला स्वतंत्र फिडर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.   या वेळी अंधारी ग्रामपंचायतचे सरपंच विजय गोरे यांनी व पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर पा. तायडे,मजुरा फेडरेशनचे दादाराव वानखेडे  जि.प.उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे. अण्णा पांडव ग्रामपंचायत सदस्य डाॅ. मनोहर गोरे. शकील पटेल. अण्णा तायडे. पांडुरंग पवार. रघुनाथ तायडे.वाहेद पटेल.अब्दुल रहीम शेख. लक्ष्मण तायडे. यांनी कार्यकारी अभियंता कन्नड यांना निवेदन दिले.

वीज चोरी केल्यास कठोर कारवाई 
कोणीही अनधिकृत वीज न वापरता अनधिकृत वीज अधिकृत वीज जोडणी करून वेळेवर वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे व कोणीही वीजचोरी करू नका. वीजचोरी केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
-  प्रदीप निकम, कनिष्ठ अभियंता  भराडी.  

 

बातम्या आणखी आहेत...