आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 लाख पळवल्याचा बनाव उघड, महावितरण वीज भरणा केंद्रातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महावितरणने वीज भरणा केंद्रासाठी नेमलेल्या संत नामदेव महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्याने ४५ लाखांची चोरी झाल्याचा केलेला बनाव पोलिसांनी उघडकीस आणला.

 शंकर औताडे (रा. हमालवाडा) या कर्मचाऱ्याने  सोमवारी रात्री सिटीचौक पोलीस ठाण्यात  धाव घेऊन ४५ लाख रुपये पळवल्याची तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी तातडीने मिलकॉर्नर येथील बिल भरणा केेंद्रात दाखल झाले. तेथील कर्मचारी किशोर शिंदे, अमोल गायकवाड, प्रशांत शंभरकर यांचे जाब-जबाब नोंदवले. महावितरणकडे माझे २८ लाख रुपये बाकी आहेत, असा दावा भांडारकर यांनी सुरू केला. तेव्हा त्यात काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. मग पोलिसांनी औताडे, भांडारकर, शिंदेला पोलिसी खाक्या दाखवला. तेव्हा हा सगळा बनाव असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, सलीम अली सरोवर येथून एक रिकामी बॅग जप्त करण्यात आली. 
बातम्या आणखी आहेत...