आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मराठा आरक्षणासाठी मतदानावर बहिष्कार, वाहेगावच्या ग्रामस्थांचा पवित्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने पूर्ण केले नाही. मराठा आरक्षणासह मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांकडे दुर्लक्ष केले. या निषेधार्थ औरंगाबाद तालुक्यातील वाहेगाव (देमणी) मधील मराठा समाजबांधवांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मराठ्यांच्या मागण्या होणार नाही मान्य, तोपर्यंत आम्हाला मतदान अमान्य,’ अशा अाशयाचे पोस्टर गावात झळकत आहेत. 

कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी देण्यात आली नाही. मराठा आरक्षण लांबणीवर पडले. फडणवीस सरकार न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडताना दिसून येत नाही. मराठा क्रांती मोर्चा काढून सरकारला इशारा देण्यात आला, त्याचाही उपयोग झाला नाही. सरकारच्या सांगण्यावरून पोलिस आयुक्तांनी औरंगाबादेत लाठी चार्ज केला. ही निषेधार्ह बाब आहे. न्याय मागणाऱ्यांची दखल घेतली जात नसेल तर मतदान कशाला करायचे? असा प्रश्न वाहेगाव (देमणी) च्या मराठा समाजाला पडला असून त्यामुळे पंचायत जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. 

फसवणुकीचा निषेध 
लोकशाहीतन्यायमिळत नसेल तर मग कशासाठी मतदान करायचे? मराठा समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. एकाही मागणीची पूर्तता सरकारने केली नाही. त्यामुळे मराठा समाजाने जि. प. पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 
-भगवान शिंदे, उपसरपंच, वाहेगाव 

येथे आहे वाहेगाव 
शहरापासून३० किलोमीटर अंतरावर वाहेगाव असून गोलटगाव गटात या गावाचा समावेश होतो. येथे ७०० पेक्षा अधिक मराठा मतदार आहेत. 
बातम्या आणखी आहेत...