आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीसाठ्यात 28 टक्क्यांनी घट; मराठवाड्यातील धरणांत केवळ 23 % पाणीसाठा शिल्लक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातील ८५४ प्रकल्पांत २३ टक्के पाणीसाठा उरला आहे. प्रकल्पीय क्षमता ७९९६ दलघमी पाणीसाठा असताना १८६७ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात ८३ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. 
 
मराठवाड्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी पाणीटंचाईचे चित्र दिसत नाही. २७ जानेवारीअखेर मराठवाड्यात एकूण पाणीसाठा ४२४३ दलघमी इतका होता. हे प्रमाण ५३ टक्के होते. आता ८५४ प्रकल्पांत २३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पात २५ टक्के, तर लघु प्रकल्पांत १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 
मोठ्याप्रकल्पांत २५ टक्के पाणीसाठा : ११मोठ्या प्रकल्पांत २८ एप्रिलअखेर १३०५ दलघमी इतका पाणीसाठा असून हे प्रमाण २५.३९ टक्के आहे. जायकवाडी प्रकल्पाची २१७१ दलघमी क्षमता असताना ६५७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हे प्रमाण ३० टक्के आहे. दररोज दोन दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जायकवाडी धरण शून्य टक्क्याच्या खाली गेले होते. येलदरी धरणात ७० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून हे प्रमाण टक्के आहे. दुधना धरणात १५१ दलघमी पाणीसाठा असून ६२ टक्के पाणीसाठा आहे. माजलगाव धरणात १११ दलघमी (३६ टक्के), मांजरा ७१ (४० टक्के), ऊर्ध्व पैनगंगा १३६ (१४ टक्के) पाणीसाठा आहे. सध्या मोठ्या ११ प्रकल्पांत १३०६ दलघमी पाणीसाठा आहे. २७ जानेवारीअखेर ११ मोठ्या प्रकल्पांत २७४६ दलघमी पाणीसाठा होता. 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील पाणीसाठा झाला कमी 
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत केवळ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. १६ प्रकल्पांची क्षमता २०५ दलघमी असताना दलघमी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील ९० लघु प्रकल्पांत १८४ दलघमी क्षमता असताना केवळ १९ दलघमी पाणीसाठा आहे. हे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. सुखना, गिरजा, वाकोद, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापुरी, नारंगी, बोरदहेगाव प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे, तर गडदगडमध्ये २२ टक्के, पूर्णा नेवपूर २६ टक्के, लहुकी ९, अजिंठा- अंधारी १० आणि अंबाडी प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 
बातम्या आणखी आहेत...