आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, 'माझ्यावरील टीका निराधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नाही, अशीच मंडळी निवडणुकीत गरळ ओकत आहे. आम्हाला नावे ठेवताना ते खोटेपणाचा आधार घेत आहेत. त्यांच्या विरोधालाही काहीच तथ्य नसून राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवत विरोधकांनी केलेली आमच्यावरील टीका बिनबुडाची आणि तर्कहीन आहे. ज्यांच्याकडे स्वत:चे काही नाही अशी मंडळी काहीही बरळत सुटली आहे, असा आरोप ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
मराठ‍वाडा साहित्य परिषदेची निवडणूक राजकीय हस्तक्षेपामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. मसापचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे पॅनल आणि डॉ. वासुदेव मुलाटे यांचे परिवर्तनवादी पॅनल आमनेसामने आहे, तर सात उमेदवारांची स्वतंत्र विकास आघाडी स्थापन केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान परिवर्तनवादी पॅनलने केलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी ठाले पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. संमेलनासाठी आमदार-खासदार शोधला जातो, हा आक्षेप ठाले यांनी खोडून काढला. निवडणुकीसाठी एखाद्या आमदाराच्या आश्रयाला जाऊन, त्याच्या संस्थेतील मतदारांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या बळावर निवडणूक लढवणाऱ्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही, असे ठाले म्हणाले.
परभणी येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या मालकीचे बी. रघुनाथ सभागृह आहे. सध्या सभागृहाची मालकी दुसऱ्या संस्थेकडे आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागून सभागृह परत मिळवू. या मुद्द्यावर परिवर्तनवादीचे मूळ परभणीचे असलेले उमेदवार मूग गिळून गप्प का आहेत, असा सवालही ठाले यांनी केला. या प्रकरणावर आपली बाजू मांडावी, असे आव्हानही त्यांनी प्रतिस्पर्धी गटाला दिले.