आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर- माळरानावर झेंडूचा बहर, दोन महिन्यांत लाखाचे उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- प्रगतिशील शेतकरी अशोक जाधव यांचा प्रयोग - Divya Marathi
- प्रगतिशील शेतकरी अशोक जाधव यांचा प्रयोग
 शिऊर - सतत अवर्षणग्रस्त असलेल्या वैजापूर तालुक्यात परंपरागत शेती करता आधुनिक यंत्रणेशी जुळवून घेत अत्यल्प कालावधीत जास्त उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. त्यातच डोंगरथडी भागात वसलेल्या शिऊर येथील शेतकऱ्यांची आधुनिक शेती करण्याकडे कमी ओढा असला तरी अशोक जाधव या प्रगतिशील शेतकऱ्याने एक एकरात झेंडूची फुलशेती करून केवळ दोन महिन्यांत लाखाचे उत्पन्न घेण्याचा प्रयोग केला आहे. चार वर्षांपासून अखंडितपणे आणि यशस्वीरीत्या करत असलेल्या झेंडूची फुलशेती परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

जानेवारीत दहा हजार रोपांची लागवड, शिर्डी, औरंगाबादच्या मार्केटमध्ये ठोक विक्री. 
शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करत वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड असलेल्या जाधव यांनी कमी खर्चात, कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात दोन महिन्यांत झेंडूचे तब्बल एक लाख दहा हजारांचे उत्पन्न घेतल्याने त्यांनी परंपरागत शेतीतून बाहेर पडून परिवर्तनाची कास धरणे कसे आवश्यक आहे हे शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे.
 
शिऊरपासून हाकेच्या अंतरावर त्यांची एकूण १७ एकर शेती आहे. आजघडीस सात एकरात डाळिंब, दोन एकरात अद्रक एक एकरात झेंडूची फुलशेती, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी लागवड केलेली आहे. चार वर्षांपासून करण्यात येत असलेल्या झेंडूच्या फुलशेतीची या वर्षीही जाधव यांनी लागवड केली असून एक एकरात दहा हजार रोपांची झेंडू फुलाची जानेवारी २०१७ मध्ये लागवड केली आहे.
 
पाण्याचे योग्य नियोजन आणि देखभालीतून अवघ्या दीड महिन्यातच रोपांना सोनेरी रंगाचे झेंडू लगडले. त्यानंतर रात्रीच्या आठच्या आधी फुलांची काढणी करून पहाटे शिर्डी आणि औरंगाबाद गाठून मार्केटमध्ये केलेल्या ठोक विक्रीतून जाधव यांनी आतापर्यंत एक लाख दहा हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. कमी वेळात आणि कमी देखभालीतून चांगली कमाई करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. 
 
झेंडू लागवडीचे वर्षभराचे नियोजन 
सुशिक्षित आणि कृषी क्षेत्रात अभ्यासू असलेल्या अशोक जाधव यांचे खरीप आणि रब्बी मोसमातील घेण्यात येणाऱ्या प्रत्येक पिकांचे चोख नियोजन असते. पाण्याची व्यवस्था म्हणून शेततळे आणि भटाना धरणालगत दहा परस विहीर घेऊन चार किमी अंतराहून पाइपलाइन करण्यात आली आहे. प्रत्येक मोसमात ते झेंडू फुलशेतीकडे हमखास लक्ष देतात. वर्षभरात तिन्ही हंगामांत क्षेत्र बदलून झेंडू लागवड केली जाते. जानेवारी महिन्यात एक एकरात दहा हजार रोपांची लागवड करण्यात येऊन ड्रिपद्वारे दररोज दोन तास पाणी दिले जाते तसेच दर पाच दिवसांनी फवारणी केली जाते. झेंडू लागवडीसाठी जाधव यांना प्रतिरोप तीन रुपये खर्च आला आहे.
उत्पादकीय खर्चाचा विचार केला तर पाच क्विंटलसाठी त्यांना केवळ एक हजार रुपये खर्च येतो. 
बातम्या आणखी आहेत...