आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकाच्या वडिलांमुळे बीड बायपासवरील मार्किंगचे काम थांबले, आज पोलिस बंदोबस्तात मोहीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिकेच्या पथकाने सोमवारी बायपासवर मार्किंग केली. - Divya Marathi
पालिकेच्या पथकाने सोमवारी बायपासवर मार्किंग केली.
औरंगाबाद- भाजपचे नगरसेवक अप्पासाहेब हिवाळे यांचे वडील विनायकराव हिवाळे यांनी विरोध दर्शवताच बीड बायपासच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी हाती घेण्यात आलेली मार्किंगची मोहीम मनपा पथकाने गुंडाळली. केवळ आठ मालमत्तांवर मार्किंग करून पथक परतले. याबद्दल मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मार्किंगचे आदेश दिले.
 
दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी अनेकांचा बळी घेणारा बीड बायपास आठ दिवसांसाठी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत जड वाहनांना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
बीड बायपासवर गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढण्याची सूचना केली. त्यानुसार सोमवारी सकाळी अकरा वाजता मनपाचे पथक मार्किंगसाठी पोहोचले. बीड बायपास सध्या १०० मीटर रुंद असून तो राष्ट्रीय महामार्गात गेल्याने २०० मीटर होणार आहे. या मार्गावरील १०० मीटरपर्यंत बाधित मालमत्तांचा मोबदला देण्यात आला. मात्र आता नव्याने रुंदीकरणात बाधित होणाऱ्या मालमत्तांचा मोबदला मिळावा, असे म्हणत व्यापारी आणि नागरिकांनी मार्किंग विरोध केला. 

सोमवारी आठ मालमत्तांवर मार्किंग केल्यानंतर दुपारी १२.४५ वाजता विनायक हिवाळे पथकाकडे पोहोचले. आधी मोबदला अगोदर द्या, नंतर काम करा, अशी भूमिका सर्वांनी घेतली. मार्किंग केल्याशिवाय मोबदला कसा ठरणार पथक प्रमुख, शाखा अभियंता एस. एल. चामले यांनी त्यांना सांगितले. पण तरीही त्यांचा विरोध काम असल्याने तत्काळ काम थांबवत पथकाने मनपा आयुक्तांकडे धाव घेतली. तेव्हा त्यांनी पोलिस बंदोबस्त घेऊन उद्या मार्किंग करा, असे सांगितले. 

महापौरांची घेतली भेट...
दरम्यान,नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांच्यासह व्यापारी जावेद पटेल यांनी महापौर भगवान घडामोडे यांची सायंकाळी भेट घेऊन मोबदला देण्याबाबत साकडे घातले. मात्र, आयुक्तांशी भेट झाली नसल्याने दोन दिवसांनंतर यावर निर्णय घेऊ, असे घडामोडे यांनी सांगितले. 

बांधकाम मंत्र्यांना पत्र... 
दरम्यान, बीड बायपास रस्त्याला सर्विस रोड तयार करावा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्तांना निवेदन दिले. या रस्त्याचे चौपदरीकरण जागतिक बँक प्रकल्प विभागामार्फत झालेले आहे. त्यामुळे त्यावर टोलही उद्योजकांकडून वसूल करण्यात येत आहे. मात्र सर्व्हिस रोडचे काम झाले नाही, असे त्यात म्हटले आहे. 

२०० मीटर रस्ता होणार 
बीडबायपासशंभर मीटर रुंदीचा असून त्याचा मोबदला संबंधितांना दिला आहे. राष्ट्रीय महामार्गामुळे तो २०० मीटरचा होईल. वाढीव १०० मीटरसाठी कोणालाही मोबदला दिलेला नाही. 
- ए.बी. देशमुख, प्रभारी, सहायक नगररचना संचालक 

मार्किंग करू देणार नाही 
नागरिकांनीयाजागा विकत घेतल्याने मनपाने मोबदला दिला नाही तर मार्किंग करू देणार नाही. व्यापारी विकासाच्या विरोधात नाहीत. पण मोबदल्याविना मार्किंग सुरू असल्याने ते न्यायालयातही जाणार आहेत. - आप्पासाहेब हिवाळे, नगरसेवक, देवळाई 

बीड बायपास आजपासून जड वाहनांसाठी बंद 
सात ते रात्री दहापर्यंत जड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १८ ते २४ एप्रिलपर्यंत सकाळी सात ते रात्री दहापर्यंत बीड बायपासवर ट्रक, कंटेनर, हायवा आदी जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. याबाबत आक्षेप असल्यास पुढील सात दिवसांत तो सहायक आयुक्त वाहतूक शाखा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

नव्या आदेशानुसार बीडकडून अहमदनगर आणि धुळ्याकडे जाणारी येणारी जड वाहने पाचोड रिंग रोडचा वापर करतील, तर जालन्याकडून येणारी नाशिक धुळ्याकडे जाणारी जड वाहने पाचोड-पैठण रिंग रोड किंवा केंब्रिज सावंगी- खुलताबाद- कसाबखेडा या मार्गाचा वापर करतील. मंगळवारी पोलिस उपायुक्त संदीप आटोळे सहायक आयुक्त सी. डी शेवगण यांनी बीड बायपास रोडची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या आदेशाचे पालन करणाऱ्या वाहनधारकांवर कलम १३१ अन्य कलमानुसार फौजदारी कारवाई होऊ शकते. 
बातम्या आणखी आहेत...