आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना : युवक-युवती रुजवताहेत सत्यशोधक विवाहाची ‘परंपरा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केच पेनने लिहून स्वकीय, नातेवाईक दिली निमंत्रण पत्रिका - Divya Marathi
केच पेनने लिहून स्वकीय, नातेवाईक दिली निमंत्रण पत्रिका
जालना - शालेय असो वा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) ही संघटना चाळीस वर्षापासून भारतभर लढत आहे. या देशभरातून ६५ लाख युवक, युवती सदस्य झाले आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरीत झालेल्या १०० ते १२० युवक, युवतींनी सत्यशोधक पध्दतीने विवाह केले आहेत. या संघटनेतील युवक, युवती जुन्या रुढी, परंपरांना फाटा देत सत्यशोधक पध्दतीने विवाह करीत महाराष्ट्रातील संत भूमीला वेगळी वाटचाल करण्यासाठी प्रेरीत करीत आहेत. 
 
आजघडीला जुन्या रुढी, परंपरेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हुंडा पद्धतीमुळे अनेक विवाहितांना आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय विवाह सोहळ्यावर अनावश्यक खर्चही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे साध्या पध्दतीने सत्यशोधक विवाह ही काळाची गरज झाली आहे. दरम्यान, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ही संघटना संपूर्ण भारतभर व्यापलेली आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील विद्यार्थी या संघटनेत सहभागी झालेला आहे. त्यांच्या विचारसरणीवर अनेक विद्यार्थी वाटचाल करीत आहेत. महाराष्ट्रातून या संघटनेशी १० लाख युवक, युवती संघटनेशी संबंधीत आहेत. जिल्ह्यातून हजार मेंबर असल्याचे एसएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यातील युवक, युवतींनी पुरोगामी महाराष्ट्रात जुन्या रुढी, परंपरांना फाटा देण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल १०० ते १२० जणांनी सत्यशोधक, आंतरजातीय विवाह करुन समाजाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. 

संघटनेने प्रेरीत 
- संघटनेमुळे प्रेरीत झालो आहे. समाजा-समाजात पडलेली परिवर्तनवादी चळवळीकडे वाटचाल सुरु केली आहे. यामुळे मी आंतरजातीय साध्या पध्दतीने विवाह करीत आहोत. धार्मिक पद्धतींचा मुळासकट बिमोड करायचा आहे.
सुनीलराठोड, उपराज्याध्यक्ष, एसफआय. 

आदर्श निर्माण करणार 
- जुन्या रुढी, परंपराना फाटा देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. आजचे युवक, युवती हे उद्याचे देशाचे भवितव्य असल्यामुळे त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम केल्या जात आहे. राज्यभरात आतापर्यंत एक हजाराच्या वर आंतरजातीय, सत्यशोधक विवाह झाले आहेत. मोहनजाधव, राज्याध्यक्ष, एसएफआय. 

सत्यशोधक विवाह गरजेचा 
सत्यशोधक विवाह केल्यास हुंडा पद्धतीला पायबंद, अनावश्यक खर्चाला फाटा, जुन्या-रुढी परंपराचे उच्चाटन, जातीयता मिटविण्यास मदत, उच्च, निच दर्जा कमी करणे आदी प्रकारांना आळा बसविण्यासाठी मदत तसेच परिवर्तनवादी चळवळीकडे वाटचाल करुन जातीयता नष्ट करीत असल्याचे मनिषा वाहुळ यांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...