आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: विवाहितेचा छळ करणारा पती, पतीची मैत्रीण सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- बजाजनगर येथील विवाहिता सीमा पाटील (३५) यांचा शारीरिक मानसिक छळ करत त्यांना घराबाहेर काढणाऱ्या पतीसह पतीची मैत्रीण सासरकडील मंडळींविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
१७ वर्षांपूर्वी सीमा एकनाथ विश्वास पाटील (मूळ रा. बोरीवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, हल्ली मुक्काम बजाजनगर) हे विवाहबद्ध झाले. विवाहानंतर दोन वर्षांनी त्यांनी बजाजनगर गाठले. गेल्या अनेक वर्षांपासून सीमाचा छळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खटके उडाल्यानंतर ती पुन्हा माहेरी गेली. ३१ मार्च २०१७ रोजी घरी परतली. मात्र, त्या वेळी सीमा यांना पतीची मैत्रीण अदिती रानडे घरात दिसली. सीमाने चौकशी केली असता अदिती ही माझी पत्नी असून तुझा माझा काही संबंध नसल्याचे सांगत सीमाला पतीने घराबाहेर काढले. याप्रकरणी सीमा पाटील यांनी सासरची मंडळी शारीरिक मानसिक छळ करत असल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. तक्रारीनुसार पती एकनाथ पाटील तसेच सासू, सासरे, नणंद पतीची मैत्रीण अदिती रानडे या पाच व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आरती जाधव या करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...