आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद- विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन जीवन संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मुकुंदवाडी परिसरात महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून जाळून घेऊन जीवन संपवले. पत्नीला वाचवताना पती किरकोळ भाजला. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. अलिमून ऊर्फ अमरीन शेख रफिक (वय २५, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. 
 
अलिमूनचा विवाह २०१० मध्ये रफिक शेख नवाबबरोबर झाला होता. या दांपत्याला एक वर्षाचा राहिल आनम (५) अशी दोन मुले आहेत. रफिक हा वाहनचालक अाहे. मोबाइल रिक्षा घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करत तो अलिमूनचा छळ करत होता. या त्रासाला कंटाळून अलिमूनने शनिवारी जाळून घेतले, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. पेटवून घेतल्याने ती गंभीर भाजली, तर तिचा पती रफिक याचे हात भाजले. घाटीत उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता तिचा मृत्यू झाला, तर रफिकवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
 
दरम्यान, आपल्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी जाळून मारल्याचा आरोप तिचे वडील अब्बास समद पठाण (रा. नांदर, ता. पैठण) यांनी केला. अलिमून हिला वारंवार पैशासाठी त्रास दिला जात होता. मारहाण करून तिला फोन लावून दिला जात होता. मारहाणीनंतर तिचे रडणे आम्हाला फोनवरून ऐकवले जात होते, असे अब्बास यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...