आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाहच्या वेळी चक्क दुल्हा निघाला शादीशुदा, त्याची पत्नी गर्भवती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - काही क्षणांत ‘निकाह’ होणार असल्याने सुरू असलेली लगबग..जेवणाची तयारी.. अन् नटून बसलेली दुल्हन ..निकाहच्या सियासतनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दुल्ह्याच्या नातेवाइकांना बोलवा असे काझींनी सांगितले. बराच वेळ झाला तरी  नातेवाईक येत नसल्याचे पाहून दुल्हनच्या नातेवाइकांना शंका आली. दुल्ह्याची सगळी ‘कुंडली’च त्यांनी काढली. चौकशीत तो विवाहित असल्याचे समोर आले अन् संतापलेल्या नवऱ्या मुलीच्या नातेवाइकांनी त्याला  भर मांडवात चांगलाच चोप देत पोलिस ठाणे दाखवले. बीड शहरातील बालेपीर येथील  रहिवासी व जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या एका तरुणीने लग्न जमवणाऱ्या एका संकेेतस्थळावर काही महिन्यांपूर्वी बायोडाटा अपलोड केला होता. महिनाभरापूर्वी बेलिम इम्रान भाई(रा. इंदिरानगर, घंचिवाद, भावनगर गुजरात)  या तरुणाने हा  बायोडाटा पाहून तिला पसंती कळवली. त्यांचे फाेनवर बोलणेही झाले. आपण बीयूएमएस डॉक्टर असल्याचे त्याने तिला सांगितले. मुलीने ही बाब आपल्या कुटुंबाला कळवून मुलगा पसंत असल्याचे सांगितले. शुक्रवारी बीडमध्ये सकाळी साडेदहा वाजता  निकाह सुद्धा ठरला. फार बडेजाव न करता साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्यांमध्ये  बालेपीर भागात  निकाह करण्यात येणार होता. शुक्रवारी सकाळी बेलीम इम्रान भाई बीडमध्ये दाखलही झाला. निकाहच्या आधी सियासतनाम्यावर दोन्ही बाजूंच्या काही नातेवाईकांची वकील म्हणून स्वाक्षरी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे काझींनी  दुल्हाहच्या नातेवाईकांना बोलावले परंतु, कुणीच आले नाही. बराच वेळ झाला तरी मुलाचे नातेवाईक येत नसल्याचे पाहून मुलीच्या कुटुंबिय व नातेवाईकांनी  दुल्हा इम्रानकडे विचारणा केली असता आपल्यासोबत कुणीच नातेवाईक आले नसल्याचे त्याने सांगितले. शंका आल्याने अधीक चौकशी केली असता गोंधळ असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. इम्रानकडून त्याच्या चुलत्याचा नंबर मिळवून मुलीच्या कुटुंबियांनी चौकशी केली असता. इम्रान  हा शादीशुदा असुन त्यांची पत्नी प्रसुतीसाठी माहेरी गेलेली आहे. असे त्याच्या चुलत्याने   सांगीतले. अवघ्या काही वेळात निकाह होणार असताना  दुल्हा शादीशुदा असून त्याने सर्वांना अंधारात ठेवल्याने संतपालेल्या नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप देत शिवाजीनगर ठाण्यात नेले. परंतु, या प्रकरणी तक्रार नसल्याने गुन्हा नोंद न झाल्याचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी सांगितले. 

म्हणे मी डॉक्टर... 
इम्रान ने आपण यूनानी डॉक्टर असल्याचे नवरीला सांगितले होते. परंतु, आता त्याच्याही या डिग्रीबाबतही शंका घेण्यात आली आहे. या प्रकरणी मुलीकडच्या लोकांनी पोलिसांत तक्रार न दिल्याने गुन्हा नोंद झाला नाही. मात्र, ऐनवेळी विवाह मोडल्याने सगळ्यांचीच निराशा झाली.

त्याची पत्नी गर्भवती 
इम्रान हा विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती असल्याचेही समोर आले. ती बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर त्याने हा प्रकार केला. त्याच्या कुटुंबालाही याबाबत काहीच माहिती नव्हती. त्यांनाही हा प्रकार धक्कादायक होता.  
बातम्या आणखी आहेत...