आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर घडमोडे म्हणतात, स्थायीचे सदस्य 100 कोटींच्या रस्त्यात आणताहेत आडकाठी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महापौरपदाचा कार्यकाळ या महिन्यातच संपत असताना आता महापौर भगवान घडमोडे यांनी पसायदान म्हणण्याऐवजी नवा राग सुरू केला आहे. १०० कोटींच्या रस्ते प्रकरणात स्थायी समितीचे सदस्य त्रास देत असल्याची त्यांची तक्रार आहे. हा वाद मिटवण्यासाठी सोमवारी सकाळी समितीतील भाजप, एमआयएमच्या सदस्यांना महापौरांच्या रायगड या निवासस्थानी बोलावण्यात आले होते. रस्त्यांच्या विषयावर स्थायी समितीत होणाऱ्या चर्चेमुळे वाद वाढत असल्याचे घडमोडे यांचे म्हणणे होते. सदस्यांनी आमच्या वाॅर्डातील रस्ते डिफर पेमेंटमध्ये घ्या, अशी मागणी केली. त्यानंतर हा वाद मिटल्याचे सांगण्यात आले. 

कशामुळे महापौरांना त्रास
डिफरपेमेंटमधून नेमके कोणते रस्ते घेतले जाणार हे अजून स्पष्ट नाही. १०० कोटींच्या रस्त्यांच्याही निविदा निघत नाहीत. त्यामुळे नेमके काय चालले आहे, हे सदस्यांना समजत नाही. परिणामी स्थायी समितीत रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेविरोधात सदस्य आवाज उठवतात. नेमके हेच महापौरांना नको होते. त्यामुळे सदस्यांकडून त्रास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

बारवालांकडून सदस्यांना आमंत्रण
महापौरघडमोडे यांच्या मनातील शंका दूर करावी यासाठी बारवाल यांनी स्थायी समितीच्या सदस्यांना बोलावून घेतले. मात्र शिवसेनेच्या सदस्यांना येथे बोलावण्यात आले नाही. सेनेला का दूर ठेवले, याचे उत्तर त्यांनी दिले नाही. बारवाल म्हणाले, गांधी जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सोबत होताे. तेव्हा घडमोडे यांनी चहापानासाठी बंगल्यावर बोलवले. तेथे सदस्यांनी डिफर पेमेंटच्या रस्त्यांवर चर्चा केली. घडमोडे यांनी त्यांचे समाधान केले. जे सोबत होते, तेवढे आम्ही गेलो, त्यामुळे सेनेला बोलावले नाही असे नाही. 

घडमोडे म्हणाले, काहींची नाराजी 
महापौर घडमोडे म्हणाले, आपल्या वाॅर्डातील रस्त्यांची कामे होत नाहीत, १०० कोटींच्या यादीत तेथील रस्ते घेतले नाहीत, यामुळे स्थायी समितीचे सदस्य नाराज होते. बारवाल यांच्यासमवेत ते आले, त्यांच्या काही शंका दूर केल्या. निविदा जारी व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर हा विषय स्थायी समितीच्या सदस्यांसमोरच येईल.
 
हे होते उपस्थित 
स्थायीसमितीतील एमआयएमचे चार, काँग्रेसचा एक, भाजपचे आणि स्वत: गजानन बारवाल असे १० जण उपस्थित होते. 

महापौर निवडणूक, सेनेसोबत युतीसाठी भाजपच्या कोअर कमिटीला सर्वाधिकार
या महिन्याच्या शेवटी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतचे मैत्रत्व कायम ठेवायचे की स्वतंत्र लढायचे यावर निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. सर्व शक्यतांवर चर्चा करून यात निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. याच आठवड्यात ही बैठक होऊ शकते. याच आठवड्यात कोअर कमिटीची बैठक असल्याचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले. कोअर कमिटीच्या बैठकीचा मुख्य विषय युतीबाबत निर्णय घेणे आहे की अन्य दुसरा हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. सेनेशी युती करता आपण लढलो तर आपला महापौर होऊ शकतो, असे इच्छुक नगरसेवकांनी सांगितल्याने ‘जुगाड जमत असेल तर कामाला लागा, दगाफटका होणार नाही याची मात्र काळजी घ्या,’ अशा शब्दांत श्रेष्ठींना काहीसा हिरवा कंदील दाखवला आहे. परंतु थेट युती होणार नाही, कामाला लागा, असेही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे काय निर्णय घ्यायचा तो तातडीने घेतला जावा. युती करता महापौरपद मिळवायचे असेल तर आतापासूनच कामाला लागले पाहिजे. उमेदवाराला मतदार जोडण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यामुळे लवकर निर्णय घेतला जावा, असे काहींचे म्हणणे आहे. भाजपमध्ये असा निर्णय स्थानिक नेत्यांची कोअर कमिटी घेते. कमिटीने काय ते लवकर स्पष्ट करावे, अशी मागणी झाल्यानंतर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात काय निर्णय होतो याकडे युतीचा निर्णय अवलंबून आहे. 
बातम्या आणखी आहेत...