आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्ययुगीन शस्त्रास्त्रांचे भांडार, नीलेश सगट यांचा हा अनोखा छंद...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्ययुगीन काळात तलवारी, ढाल, भाले, बिचवे, चिलखताला खूप महत्त्व होते. या शस्त्रांच्या बळावर गड-किल्ले जिंकले जात होते. ज्याचे गड-किल्ले, त्याचे राज्य. त्यामुळे या शस्त्रास्त्रांना खूप महत्त्व होते. मुंबईतील नीलेश सगट यांच्याकडे असाच ऐतिहासिक संग्रह आहे. मराठा तलवार, मुगल तलवार, बुर्जे चिलखत, चामड्याच्या ढाली, शिरस्त्राण, भाले, जमदाड, तोफगोळे, कुलपी गोळे, बिचवे, कट्यार, वाघनखे, पाण्यावरच्या विटा, तेगा, समशेर, दांडपट्टे अशी तेराशेहून अधिक शस्त्रे त्यांच्याकडे आहे. 
 
मूळचेसांगली जिल्ह्यातील विटा या गावात राहणारे नीलेश सगट. जुन्या काळापासून वडिलोपार्जित तलवार त्यांच्या घरात होती. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांना त्या तलवारीचे आकर्षण वाटले. आपल्याकडेही अशा प्रकारची शस्त्रे असावीत या प्रेरणेतून त्यांनी छंद जोपासला. महाविद्यालयात आल्यानंतर त्यांनी विविध शस्त्रे संग्रहित करण्यास सुरुवात केली. 

विविधशस्त्रांचा संग्रह 
बारावीपर्यंतशिक्षण घेणारे नीलेश सगट यांनी शस्त्रांचा अभ्यास सुरू केला. यातून त्यांच्याकडे दुर्मिळ मराठा धोप, कर्नाटकी धोप, वर्क तलवार, मराठा तलवार, मुगल तलवार, बुर्जे चिलखत, चामड्याच्या ढाली, शिरस्त्राण, भाले, जमदाड, तोफगोळे, कुलपी गोळे, विविध प्रकारचे बिचवे, कट्यार, वाघनखे, पाण्यावरच्या विटा, तेगा, समशेर, दांडपट्टे, अशी अनेक प्रकारचे शस्त्रे त्यांच्या संग्रहात आहेत. तेराशेहून अधिक शस्त्रांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. 

राजर्षी शिवबा विचार प्रसारक मंडळातर्फे शस्त्र विशारद पदवी 
नीलेशयांना अप्पा परब आणि शस्त्रपारंगत गिरीश जाधव यांच्याकडून राजर्षी शिवबा विचार प्रसारक मंडळातर्फे शस्त्र विशारद ही पदवी रायगडावर प्रदान केली आहे. एवढेच नव्हेतर नीलेश यांनी स्वत:च्या हाताने ९८ किलो वजनाची तलवार तयार करून ती खंडोबाला अर्पण केली आहे. या तलवारीचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदही झाली आहे. शस्त्रे संग्रहित करण्यासाठी आजपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, विजापूर, चेन्नई, कर्नाटक, दिल्ली येथे जाऊन मौल्यवान ठेवा जपला आहे. 

कर्नाटकी धोप 
कर्नाटकीधोप ही ४२ ते ४८ इंच लांबीची असते. शिवाजी महाराजांच्या युध्दकाळात अशा प्रकारच्या तलवारींचा वापर केला जात होता. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या तलवारीचे पाते लांब असायचे. या तलवारीच्या मुठीजवळ गोंडा असतो. तसेच त्याची मूठ ही कर्नाटकात तयार केली जात होती. नीलेश यांनी विजयनगरातून अशा धोप संग्रहित केल्या आहेत. 

बुर्जेशस्त्र 
युद्धाच्याप्रसंगी संरक्षणासाठी चिलखत वापरले जात होते. या चिलखतवर तलवारीचा वार केल्यास कुठल्याही प्रकारची इजा होत नव्हती. असे असले तरी चिलखत घातलेल्या शत्रूवरही वार करण्यासाठी बुर्जे नावाचे शस्त्र वापरले जात होते. या शस्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांपासून हे शस्त्र तयार करण्यात आले आहे. यात तलवारीसारखे मूठ असते. या शस्त्राच्या टाेकाला काटेरी लोखंडी कोन तयार करण्यात आलेला असतो. याने चिलखतही फाडले जाते. 

वर्क तलवार_ संग्रहातवर्क तलवारसुध्दा बघायला मिळते. या तलवारीचे वैशिष्ट्य म्हणजे ३८ ते ४० इंच लांबी असून पाते वर्क आहेत. त्यामुळे शत्रूवर वार करण्यास सोपे जाते. नीलेश यांच्याकडे राजपूत, शीख, मराठा तलवारी संग्रहित ठेवण्यात आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांना इतिहास कळेल 
मुलांनाशस्त्रांचीओळख व्हावी यासाठी संग्रहाचा नक्की उपयोग होईल. अडीचशे शस्त्रांची प्रदर्शने भरवली आहेत. शाळांमध्येही जनजागृती केली जाते. -नीलेश सगट, संग्राहक

बिचवे, कट्यार आणि फुटांचा भाला 
शस्त्रांमध्येसर्वात लहान शस्त्र म्हणून बिचवे याला समजले जाते. सहजरित्या लपवून ठेवू शकतो. अशा प्रकारचे शस्त्र युध्दात वापरली जात होती. तसेच मराठा, मुघल कट्यारीसुध्दा बघायला मिळतात. त्यासोबतच संग्रहात दाक्षिणात्य फूट लांबीचा भाला असून पोलादापासून तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याला तांग असे म्हटले जाते. अशा प्रकारचे भालेही इतिहासाला उजाळा देत आहेत.ही शस्त्रे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. 
हत्तीच्या कातड्याची ढाल 
कर्नाटकातीलविजयनगरात मोठया संख्येने हत्तींचे कळप होते. त्यात पिसाळलेला आणि शिकारीत मारल्या गेलेल्या हत्तीच्या कातड्यांचा वापर ढाली तयार करण्यासाठी होत होता. पोलादी धातूपासून तयार केलेल्या ढालीच्या तुलनेत या ढालीचा घेरा १८ ते २२ इंचांनी मोठा होता. त्यामुळे गनिमी काव्यासाठी अशाप्रकारच्या ढालीचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. त्यांच्याकडे हत्तीसह उंटाच्या चामड्यापासून तयार केलेल्या ढालीही लक्ष वेधून घेतात. 

शिवकालीन धोप 
छत्रपतीशिवाजी महाराजांच्या काळात घोडेस्वारी करताना शत्रूपर्यंत वार करण्यासाठी तलवारी पोहोचत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी लांब आणि सरळ पात्याच्या तलवारी तयार केल्या. यालाच मराठा तलवार म्हटली जाते. चार ते साडेचार फूट लांबीची आणि पितळी आवरण असलेली तलवार आहे. या आवरणामुळे हाताच्या बोटाला संरक्षण मिळते. अशा प्रकारच्या धोप त्यांच्याकडे संग्रहित आहेत. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन पाहा विविध शस्त्रांचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...