आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडेंच्या स्मारकाऐवजी ट्रॉमा केअर सेंटर उभारणीच योग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यात कोठेही शासकीय ट्राॅमा केअर सेंटर अर्थात अपघात रुग्णालय नसल्याने गोरगरिबांना उपचारांवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. गतवर्षी राजधानी दिल्लीत रस्ते अपघातात अत्यवस्थ झाल्यानंतर भाजप नेते, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे औरंगाबादेत मुंडे यांचे फक्त स्मारक उभारण्याऐवजी ट्राॅमा केअर सेंटर उभारण्याची मागणी आता पुढे येत आहे. विशेष म्हणजे एमआयएमच्या विरोधामुळे आतापर्यंत ताठर भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्यांनीही या कल्पनेचे स्वागत केले आहे.
गतवर्षी राजधानी दिल्लीत तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना जबर दुखापत झाली होती. त्यातच त्यांचे निधन झाले. राज्यात भाजपची पाळेमुळे रोवण्यात मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. मराठवाड्यात तर अवघा भाजप त्यांचाच अनुयायी होता. मुंडे यांच्या निधनाला जून रोजी एक वर्ष झाले. त्यानिमित्ताने मुंडे यांचे औरंगाबादेत भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली.
जालना रोडवरील दूध डेअरीच्या परिसरातील दहा एकर जागेवर स्मारक उभारण्याची घोषणा झाली. स्मारकाऐवजी रुग्णालय उभारावे, अशी भूमिका एमआयएमने घेतली. एवढेच नाही तर आपण मुंडे कुटुंबीयांशी बोलू, असे एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी जाहीरही केले.
मुंडेंंच्या स्मारकाच्या वादात एमआयएमने उडी घेतल्याने भाजपच्या कार्यकर्ते, नेत्यांत चलबिचल निर्माण झाली. केवळ स्मारक उभारण्याऐवजी मुंडे यांच्या कार्याला पूरक ठरेल असा प्रकल्प हाती घ्यावा, अशी अनेक भाजप कार्यकर्त्यांची भावना होती; पण एमआयएममुळे त्यांनी ही मागणी पुढे रेटली नाही. ‘दिव्य मराठी’शी बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक असणाऱ्या किंबहुना त्यांच्यामुळेच राजकारणात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय आहे सूचना?...सूचना चांगली, पण...