आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विरोधकांनी कुरघोडीचे राजकारण करू नये’; आमदार अब्दुल सत्तार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- विरोधकांनी विकासकामांमध्ये कुरघोडीचे राजकारण करू नये, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी विकासकामांच्या उद््घाटनप्रसंगी केले.
  
भराडी गटात आ. सत्तार यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ कोटींच्या विकासकामांचे उद््घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर  होते. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, काँग्रेसचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार कल्याण काळे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष गणेश दौड, प्रभाकर काळे, दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतला बन्सोड, जि. प. सभापती विनोद तांबे, बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. सत्तार पुढे म्हणाले, वरच्या वर निर्णय घेण्यात येत असतील, तर शेतकरी, शेतमजूर, निराधार गरिबांच्या व्यथा समजणार कशा? असा सवाल करून सत्तार यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. या वेळी भराडी सर्कलमधील रस्ते, सिमेंट बंधारे, सामाजिक सभागृह, पूल तसेच ३  कोटी रुपयांचे आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन अशा विविध विकासकामांसह ३१  कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण केल्याचे जाहीर केले. जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  

अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश  
कार्यक्रमाप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष संजय रामजी राकडे, मनसेचे उपतालुकाध्यक्ष भरत मोरे, बापू काळे, कैलास खराते, प्रकाश महाजन (सर्कल प्रमुख) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेमध्ये प्रवेश केला. आमदार  सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
बातम्या आणखी आहेत...