आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनशक्तीच्या विरोधात गड राखला : आमदार सत्तार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - भाजपच्या धनशक्तीच्या विरोधात काँग्रेसने गड राखल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कारप्रसंगी बोलताना केले. 
सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सदस्यांचा सत्कार रविवारी (दि.५) करण्यात आला. सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पालोदकर होते. आमदार अब्दुल सत्तार, आमदार सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, देवगिरी सह. साखर कारखान्याचे चेअरमन जगन्नाथ काळे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, सिल्लोड बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर, औरंगाबादचे संजय औताडे, फुलंब्रीचे संदीप बोरसे, कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, खुलताबादचे अॅड. एस. एम. कमर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा पानकडे आदींची उपस्थिती होती.  
बातम्या आणखी आहेत...