आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी झाल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही : अब्दुल सत्तार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - राज्य सरकारने खोटी व फसवी कर्जमाफी जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली. सरकारचा हा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसच्या वतीने ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ हे अभियान  राबवण्यात येत अाहे. त्या अनुषंगाने गावागावात जाऊन कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून घेण्यासाठी येथील भक्तनिवासमध्ये शनिवारी बैठक घेण्यात आली.
 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीला आमदार सुभाष झांबड, फिरोज पटेल, माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, नगराध्यक्ष अॅड. एस. एम. कमर, अॅड. माजी नगराध्यक्ष कैसरोद्दीन, समद टेलर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रारंभी काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल आमदार सत्तार यांचा सत्कार करण्यात आला.  सत्तार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि ज्यांचा सातबारा कोरा होत नाही अशा सर्व शेतकऱ्यांकडून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’चे अर्ज भरून घ्यावयाचे आहेत.  सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.
 
सिल्लोड येथे शुक्रवारी अभियानाची सुरुवात
सिल्लोड-  फसव्या कर्जमाफीने संकटात  सापडलेल्या शेतकऱ्यास कर्जमाफी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ  बसणार नसल्याचे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. तालुका काँग्रेस  कमिटीच्या वतीने शुक्रवारी सिल्लोड येथे  अभियानाची सुरुवात आ. सत्तार यांच्या हस्ते करण्यात  आली.  प्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश  दौड, नगराध्यक्ष अब्दुल समीर, सभापती रामदास  पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, दामोदर गव्हाणे, महिला  आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, देविदास लोखंडे  आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...