आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालता हो, तू संवाद यात्रेमध्ये आलाच कसा? शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाजप आमदार घसरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - आमदार साहेब, पन्नास हजारात शेततळे होते का, ते कसे होणार हे आम्हा शेतकऱ्यांना समजून सांगा, असा प्रश्न शेतकऱ्याने विचारताच भाजप आमदार अतुल सावे ‘तू संवाद यात्रेत आलाच कसा? चालता हो इथून,’ अशा शब्दांत त्याच्यावर घसरले. आ. सावे घसरल्याचे  पाहून भाजप पदाधिकाऱ्यांनाही जोर चढला आणि ते त्या शेतकऱ्याच्या अंगावर धावलेे. हा प्रकार रविवारी पैठण तालुक्यातील आगर नांदर येथे शिवार संवाद यात्रेत घडला. रविवारी आमदार सावे, भाजप तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांच्या प्रमुख उपस्थित पैठण तालुक्यात अनेक गावात भाजपची शिवार संवाद यात्रा सुरू झाली. 

यात शेतकऱ्यांनी  कर्जमाफीच्या मुद्यावर सावेंना धारेवर धरले. मात्र आगर नांदर येथे प्रमोद थोरात या तरुण शेतकऱ्याने आमदार सावे यांना थेट तुमचे प्रदेशाध्यक्ष दानवे शेतकऱ्यांना शिवीगाळ करतात. मग तुम्ही तरी सांगा पन्नास हजारात शेततळे कसे होते? ते तयार करून दाखवा असा प्रश्न विचारताच आमदार सावेंचा पारा चढला आणि ‘तू संवाद यात्रेत आला कसा चालता हो इथून असे त्या शेतकऱ्याला बजावले. 

यावर भाजप स्थानिक पदाधिकारी ही या शेतकऱ्यावर धाउन गेले. मात्र काही शेतकरी आपल्या मोबाईलवर या प्रकाराचे चित्रण करत असल्याचे पाहताच आमदार सावे यांनी खाली बसले व आम्ही सरकारला शेततळ्याचे अनुदान वाढविण्यचे सांगणार असल्याचे सांगितले. 

कारवाई करा
खासदार रावसाहेब दानवे आमच्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात व आमच्या शेतकऱ्यांवरच आगपाठ करतात असे का?, असे सावे यांना विचारले त्यावर ते भडकले. शिवाय कर्जमाफी कधी करणार यावर अामदार अतुल सावे यांनी बोलू नका अशी भाषा वापरली.आमदारावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी शेतकरी प्रमोद थोरात यांनी केली आहे.

विरोधकांनी पाठवले 
 या शेतकऱ्याला येथे विरोधकांनी पाठवले असण्याची शक्यता आहे. त्यातून काही चुकीचे प्रश्न तो शेतकरी करत होता. यावर आमदार सावे काही चुकीचे बोले नाहीत, असे भाजपचे पैठण तालुकाध्यक्ष   तुषार शिसोदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
 
मागच्या सरकारने  काय दिले ; आमदारांचा शेतकऱ्यांना सवाल 
संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा विषय काढला असता आमचे सरकार तरी शेतकऱ्यांना काही तरी देते. याची शेतकऱ्यांनी जाणीव ठेवावी व नंतर बोलावे असे टोमणेही सावे यांनी शेतकऱ्यांना मारले.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...