आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेष्ठींनी झापताच आ. जाधवांचे बंड थंड, दिला होता शिवसेना सोडण्याचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड/औरंगाबाद - मुस्लिम मताधिकाराबाबत खा. संजय राऊत यांची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मान्य असेल तर यापुढे शिवसेनेबरोबर काम करण्याची आपली इच्छा नाही आणि भविष्यात शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढणारही नाही, असा आक्रमक पवित्रा घेणारे कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी श्रेष्ठींनी कानउघाडणी करताच तलवार म्यान करत घूमजाव केले आणि आपण असे काही निवेदन केलेच नसल्याचा खुलासा केला.
फोटो - आ. हर्षवर्धन जाधव यांनी कन्नडमध्ये स्वत:च्या स्वाक्षरीने दिलेले हेच ते पत्रक. त्याला आता ते अनौपचारिक चर्चा म्हणू लागले आहेत.

आ. जाधव यांनी कन्नडमध्ये पत्रकारांना स्वत:च्या स्वाक्षरीचे पत्रक दिले त्यावेळी काही मुस्लिम कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. जाधवांचे हे निवेदन सोशल मीडियामार्फत वाऱ्यासारखे पसरले. आणि पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले. त्यानंतर शिवसेना श्रेष्ठींनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी खुलाशाचे दुसरे निवेदन पत्रकारांकडे पाठवून दिले. त्यात कन्नडमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे नमूद केले. आपली राजकीय कारकीर्द धोक्यात येईल, असा साक्षात्कारही त्यांना नंतर झाला.

विधानाचा विपर्यास; राऊतांचे घूमजाव
औरंगाबाद | मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्यासंदर्भातील विधानावरून देशभर गदारोळ झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी घूमजाव करत आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. औरंगाबादेत प्रचारासाठी आले असता तेे म्हणाले की, मुस्लिमांचा आतापर्यंत फक्त मतांपुरताच वापर झाला आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार काढला तर राजकीय पक्षांचे राजकारणच थांबेल, असे आपल्याला म्हणायचे होते.