आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळसूत्र गहाण ठेवून लावला पैसा, या आहेत आधुनिक उद्योग क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी ‘शकुंतला’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शकुंतला घोटे या स्वत: प्रत्यक्ष मशीनवर काम करताना. - Divya Marathi
शकुंतला घोटे या स्वत: प्रत्यक्ष मशीनवर काम करताना.
जगामध्ये अशक्य असे काहीच नसते. मनात आणले तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा कठोर परिश्रम, प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय पूर्ण करण्याच्या प्रखर महत्त्वाकांक्षेच्या बळावर साध्य करता येते. अशाच एका महिलेला पतीची एक कल्पना कुटुंबाचे नवे आयुष्य उभारू शकते, हे वयाच्या ५० व्या वर्षी वाटले आणि तिने ती कल्पना प्रत्यक्षात उतरवलीदेखील. अशाच एका जिगरबाज महिलेची ही कहाणी... इतर महिलांना नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल. 
 
प्रत्येक पुरुषाच्या यशामागे महिलेचा हात असतो, असे म्हटले जाते. हे खरे आहे. वैजापूर तालुक्यातील चाकेगावच्या शकुंतला घोटे या केवळ दुसरीपर्यंत शिकलेल्या असल्या तरी त्या आज उद्योजिका आहेत. एका छोट्याशा युनिटच्या मालक आहेत. पतीच्या वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर शकुंतला यांनी दुचाकीचे स्पेअर पार्ट््स बनवण्याचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले. अनंत अडचणी, संघर्षानंतर ही जोखीम त्यांनी घेतली. सुुरुवातीला नुकसान सहन करावे लागले, हिरमोड झाला, पण उद्योग यशस्वी करून दाखवायचाच, हे पती-पत्नीने ठरवले. त्यांनी घेतलेली रिस्क आज फळाला आली. दुचाकीच्या पाच प्रकारच्या अॅक्सलरेटर पिन शॉकअप बुशच्या उत्पादनातून घोटे कुटुंब महिन्याला दीड लाख कमाई करते. भांडवल, मशीनरी आणि नफा...घोटे दांपत्यानेकसेतरी पैसे जमवून कारखाना सुरू केला आणि दीड वर्षातच दुसरी मशीन खरेदी केली. नंतर बँकेकडून साडेसात लाखांचे कर्ज काढून दोन ट्रॉड मशीन घेतल्या. भांडवल मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळाला. सध्या त्यांच्याकडे सात मशीन्स असून पाच महिला कामगार आहेत. २०१४ मध्ये सुरू केलेल्या युनिटमध्ये उत्पादनांच्या माध्यमातून ते महिन्याला दीड लाख रुपये निव्वळ नफा कमावतात. त्यांचा माल शहरातील तीन मोठ्या कंपन्यांना पुरवला जातो. ज्यांना पुरवठा केला, त्या कंपन्यांनीदेखील आर्थिक मदत केल्याचे शकुंतला सांगतात. 

पार्टनरशिपमध्ये उद्योग सुरू केला होता. दरम्यान, त्यांच्याशी वाद झाला आणि मीच पतीला स्वतंत्र उद्योग सुरू करण्याचे सुचवले. त्यांनीदेखील मान्य केले. माझे शिक्षण दुसरीपर्यंतच झाले आहे. मात्र, पतीने शिकवलेली तांत्रिक कामे मी आत्मसात केली आणि माझा मुलगादेखील कॉलेज करून आम्हाला मदत करतो. शकुंतलाघोटे, संचालिका,मातोश्री एंटरप्रायझेस 
१९९१ मध्ये आम्ही गाव सोडले. औरंगाबादला आल्यानंतर कँटीनमध्ये वेटरची कामे केली. त्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्राचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन ऑपरेटिंग कंपनीत नोकरी मिळाली. सुपरवायझर, शॉप इन्चार्ज म्हणून नऊ वर्षे काम केल्यानंतर भरपूर अनुभव आला होता. याच जोरावर आम्ही उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. बाबासाहेब घोटे 
 
पुढील स्लाईडवर वाचा, मंगळसूत्र गहाण ठेवून लावला पैसा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...