आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL : 7 दिवसांपासून मान्सून महाराष्ट्रातच अडकला, हवामान खात्याच्या अंदाजांना मान्सूनचा गुंगारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद - यंदा केरळात निर्धारित वेळेच्या एक दिवस आधीच आगमन झालेला मान्सून गेल्या सात दिवसांपासून एकाच जागी रखडला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी दिला आहे. या वर्षी केरळातील आगमनानंतर मान्सूनने हवामान खात्याच्या सर्व अंदाजांना गुंगारा दिला आहे. महाराष्ट्रात १२ जून रोजी आलेला मान्सून सध्या नाशिक, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यांच्या उत्तर सीमांवर स्थिरावला आहे. विशेष म्हणजे सात दिवसांपासून आहे त्याच जागी स्थिरावल्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. या वर्षी ३० मे रोजी एक दिवस अगोदरच मान्सून केरळात दाखल झाला. मात्र, तेव्हापासून मान्सूनची आगेकूच मंदगतीने सुरू आहे. आगमनानंतर ३० मे ते ५ जून या काळात मान्सून दक्षिण केरळात एकाच जागी स्थिर होता. तेथून महाराष्ट्र गाठण्यासाठी मान्सूनला ८ जून उजाडला होता. तळकोकणातून मध्य महाराष्ट्रातील काही भागात येण्यासाठी मान्सूनने पुन्हा दोन दिवसांचा कालावधी घेतला. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातील यवतमाळ, बुलडाण्यापर्यंत मजल मारण्यास मान्सूनला १२ जून उजाडला. मागील सात दिवसांपासून मान्सून याच ठिकाणी स्थिरावला आहे. मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे मागील १९ दिवसांपासून आयएमडीचा अंदाज सांगतो, मात्र तसे घडले नाही.

९ तालुक्यांत ३०% पेक्षा जास्त पाऊस
१ जून ते १९ जून काळात बीडमधील आष्टी तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ३९.१% पाऊस झाला आहे.
- वैजापूर (३३.२) {पाटोदा (३०.९) {लोहारा(३१.१)
- उमरगा (३५.९){उस्मानाबाद (३४.४) - तुळजापूर (३४.७)
-अहमदपूर (३२.६){चाकूर (३०.३) तालुक्यांत ३० टक्क्यांहून जास्त पाऊस झाला आहे.

आता मोघम इशारा : आयएमडीने मान्सूनच्या वाटचालीस येत्या दोन-तीन दिवसांत अनुकूल स्थिती निर्माण होईल असा मोघम इशारा दिला आहे. पुणे वेधशाळेने २० ते २३ जून पर्यंत राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.़
 
पावसाचा उस्मानाबाद, लातूरलाच लाभ
एक जून ते १९ जून या काळात वार्षिक सरासरीच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यात २८.४ टक्के, लातूर जिल्ह्यात २३.४ टक्के पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी १२.४ टक्के पाऊस झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...