आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : श्रमदानातून साताऱ्यात खोदला एक लाख लिटर क्षमतेचा तलाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉर्निंग वॉक ग्रुपच्या २५ सदस्यांचा पुढाकार, दररोज एक तास काम केले, - Divya Marathi
मॉर्निंग वॉक ग्रुपच्या २५ सदस्यांचा पुढाकार, दररोज एक तास काम केले,
सातारा परिसरातील डोंगरांवरून येणारे पाणी साठवणीचे उपाय नसल्याने मोठ्या प्रमाणात ते वाया जाते. हेच पाणी अडवल्यास आसपासच्या भागाला मुबलक पाणी मिळेल, असा विचार करत दररोज मॉर्निंग वॉकला येणाऱ्या एका ग्रुपने श्रमदानातून चक्क तलाव खोदला आहे. रोज एक तास श्रमदान करून सहा महिन्यांच्या कालावधीत अगदी नेटाने त्यांनी हा उपक्रम पूर्ण केला. आता एक लाख लिटर क्षमतेचा हा तलाव पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला आहे. माती आणि दगडांचा भराव टाकून तयार केलेला हा तलाव टंचाईच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. 
 
सातारा डोंगरावर रोज असंख्य नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यामध्ये अभियंते, वकील, डॉक्टर, व्यावसायिक, नोकरदार यांचा समावेश आहे. अशाच काही समविचारी लोकांनी मिळून ‘सातारा डोंगर ग्रुप’ नावाचा एक ग्रुप तयार केला. रोज सकाळी वॉकसाठी येणाऱ्या या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी सकारात्मक काम करायचे ठरवले. सुरुवातीला त्यांनी डोंगरावर लिंबाच्या बियांचे रोपण केले. तसेच डोंगरावरून येणारे पाणी अडवण्यासाठी उतारावर शेकडो ट्रेंचेस तयार केले. मात्र, एवढे करूनही आसपासच्या परिसरातील विहिरी बोअरवेल्सना पाणी लागत नव्हते. शेवटी ग्रुपमधील अभियंते महादेव कल्याणे आणि अरुण घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ग्रुपच्या सदस्यांनी जायकवाडी धरण बांधण्यासाठी वापरलेल्या तंत्राचा वापर करत एक लाख लिटर क्षमतेचा तलाव सहा महिन्यांच्या कालावधीत तयार केला. 
 
यांनी केले श्रमदान 
अरुणघाटे, प्रदीप गायकवाड, अविनाश अडसकर, रवींद्र बारगजे, तुकाराम मगर, प्रशांत मालोदे, गणेश थोरात, आबासाहेब राऊत, ताराचंद चव्हाण, चंद्रभान बनसोडे, भाऊसाहेब भोसले, रमेश राजोळे, माधव कल्याणी, महेंद्र पाटील, वीरानंद शिरसाट, सचिन गायकवाड, शिवाजी झिरपे, सुनील कुमावत, सुनील मिसे, रवींद्र देशपांडे, महादेव राजोळे, अनिल पाटील, पोपटराव जाधव, लक्ष्मीरमण वाडकर, सतीश घोरपडे यांनी श्रमदान केले. 

युक्तीने केले काम 
ग्रुपच्यासदस्यांनी गेल्या वर्षी दिवाळी झाल्यानंतर तलावाच्या कामास सुरुवात केली. ग्रुपचे २५ सदस्य दररोज सकाळी एक तास श्रमदान करत होते. सुरुवातीला त्यांनी काळी माती, मुरूम दगडांची पिचिंग केली. त्यानंतर तलाव खोदण्यात आला. त्यानंतर त्यातील माती काठावर टाकण्यासाठी त्यांनी एक युक्ती वापरली. दोन बांबूंना बारदाने जोडले. त्यात माती भरली आणि दोन्ही हातांनी बांबूचे दोन टोक पकडून तलावासाठी माती टाकण्यात आली. तलाव बांधण्यासोबतच त्यांनी तलाव परिसरामध्ये वृक्षारोपणही केले. 
 
पुढील स्लाइडवर पाहा फोटो आणि वाचा एक पैसाही खर्च न करता केले काम... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)