आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डास नियंत्रणासाठी केला जातो दरवर्षी १९ कोटी रुपये खर्च!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात राहणारी पावणेतीन लाख कुटुंबे दरवर्षी डास निर्मूलनासाठी अंदाजे किमान १९ कोटी रुपये खर्च करीत आहेत. त्यात महापािलकेच्या खर्चाचा आकडा (सव्वातीन कोटी रुपये) िमळवला तर ती रक्कम २२.२५ कोटींवर पाेहोचते. कायमस्वरूपी डास निर्मूलन करण्यात यश आले तर पाच वर्षांत वाचू शकणारी तब्बल १०० कोटींहून अधिक रक्कम सत्कारणी लागू शकते.
शहर आणि परिसरात यंदा डासांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुन्यासारखे आजार झालेल्यांची संख्या ४३, तर सदृश्य आजारांमुळे वेदना सहन कराव्या लागणाऱ्यांची संख्या ३०० च्या घरात आहे. अशा आजारांमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दरवर्षी सरासरी १५ ते २० अशी आहे. मानवी जीविताचे होणारे हे नुकसान कशानेही भरून काढता येणारे असेच आहे. मात्र, त्याकडे आवश्यक तितक्या गांभीर्याने पाहिले जाते असे दिसत नाही.

ही रक्कम सत्कारणी लागली तर...
शहरातहा खर्च झाला नसता तर पाच वर्षांत किमान १०० कोटी रुपये शिल्लक राहिले असते आणि त्यातून काही चांगले काम उभे राहू शकले असते.

{केवळ महापािलकेचेच १६ कोटी रुपये वाचून त्यातून पाच वर्षांत किमान मोठे रस्ते ८-१० वर्षांसाठी दुरुस्त झाले असते ही वस्तुस्थिती आहे.

असा होतो कुटुंबांचा खर्च
शहरातएकूण २.७० लाख कुटुंबे राहतात, असा अधिकृत आकडा महापािलकेकडून सांगण्यात येतो. या प्रत्येक कुटुंबाचा डास निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांवरचा खर्च दरमहा ६० रुपये (एक माॅस्क्युटो िरपिलंट रिफिलर किमान ६० रुपयांना िमळते म्हणून) गृहीत धरला तर दरमहा कोटी ६२ लाख रुपये त्यावर खर्च होतात. सर्वच कुटुंबांत ते वापरले जात नसले तरी अनेक कुटुंबांत प्रत्येक खोलीत ते वापरले जात असल्यामुळे सरासरी संख्या तेवढी गृहीत धरता येते. वर्षभरात हा खर्च तब्बल १९ कोटी ४४ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. महापािलकेचा फाॅगिंग मशीन्स, त्यासाठी लागणारे इंधन, औषध आणि कर्मचारी असा केवळ डास निर्मूलनाचा खर्च ३.२५ कोटी रुपयांवर आहे, असे महापािलकेकडून सांगण्यात आले. याशिवाय डासांमुळे येणाऱ्या आजारपणात उपचारांवर होणारा वैयक्तिक खर्च आणि महापािलकेचा अशा आजारांवर रुग्णालयात होणारा खर्च वेगळाच आहे.