आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसादेवीतील घरांवर मायलेकीच्या नावांची पाटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या आदर्श गावात घरातील गृहिणीच्या नावाने घराबाहेर पाटी लावून महिलांप्रती सन्मान व्यक्त करण्यात आला. या गावांप्रमाणे शहरातील पिसादेवीतील ५० घरांवर गृहिणी आणि मुलीच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. महिलांचा सन्मान व्हावा याकरिता मेधावी बहुउद्देशीय संस्था आणि नटखट प्री स्कूलतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
सहसा घराच्या भिंत वा दारावर कुटुंब प्रमुख पुरुषांच्या नावाची पाटी लावली जाते. परंतु काळानुसार आता महिलांना सन्मान मिळावा आणि घराच्या भिंतीवर आपले नाव असल्याचा आनंद मिळावा याकरिता हा उपक्रम राबवण्यात आला. कुटुंबात मुलगी असेल तर मुलीचे आणि त्यानंतर आई, वडिलांचे नाव आणि आडनाव असा उल्लेख पाटीवर केला गेला आहे. जालना जिल्ह्यातील दादाभाऊ जगदाळे या जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवत पंचवीस गावांतील पाच घरांवर मुलीच्या किंवा महिलेच्या नावाची पाटी लावली. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलण्यास मदत झाली. त्या उपक्रमातून प्रेरणा घेत मेधावी बहुउद्देशीय संस्थेने हा उपक्रम हाती घेतला.
घराच्या दारावर मायलेकीच्या नावाची पाटी लावताना तरुणी.

^स्त्री भ्रूणहत्या सध्याचा चिंतेचा विषय बनला आहे. असा उपक्रम राबवल्याने मुलींविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलून घरात मुलीला तिचे स्थान मिळेल. -कल्पना राजगिरे

^दारावर पाट्यालावल्याने समाजात महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. महिला,मुलीविषयी आदर,सन्मान व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक महिन्याला पन्नास घरांवर अशा पाट्या लावून जनजागृती करणार आहे. -वैशाली फुटाणे, अध्यक्ष मेधावी संस्था

^आपल्या घरावर पतीसोबत माझे नाव आल्याने खूप आनंद झाला. अशा उपक्रमाने समाजात निश्चित बदल होईल. -ज्योती निकम, रहिवासी
बातम्या आणखी आहेत...