आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक लाभाच्या संस्था चालवणे कसरतीचे काम- रावसाहेब दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड -  अार्थिक लाभाच्या संस्था चालवणे तारेवरची कसरत असल्याचे प्रतिपादन खा. रावसाहेब पा. दानवे यांनी केले. ते सिल्लोड येथे जनता सहकारी नागरी पतसंस्थेच्या पूरक उद्योगाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.  
 
अध्यक्षस्थानी रा.स्व. संघाचे विभाग संघचालक अनिल भालेराव होते. या वेळी मुर्डेश्वर  पीठाचे पीठाधीश काशीगिरी महाराज, माजी आमदार श्रीकांत जोशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे संचालक विवेक देशपांडे, संस्थेचे  व्हाइस चेअरमन दिनकरराव कापसे, संस्थापक अध्यक्ष अॅड. विलास सोनवणे, माजी आ. सांडू  पाटील लोखंडे, भाजपचे सुरेश बनकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, चिटणीस विठ्ठल वानखेडे, पंचायत समितीचे सभापती ज्ञानेश्वर तायडे, सिद्धेश्वर चेअरमन 
 इद्रिस मुलतानी, माजी चेअरमन श्रीरंग पा. साळवे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती ठगन भागवत, डॉ. मच्छिंद्र पाखरे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राऊत,भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा विजया गव्हाणे, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अशोक तायडे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय डमाळे , तर आभार प्रदर्शन रघुनाथ घरमोडे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...