वेरुळ - महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नासह दहा हजार रुपयाच्या मदतीवरुन निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कारण महाराष्ट्र सरकारने सध्या जे निकष ठेवलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत या प्रश्नावर शरद पवार साहेब स्वत: मुख्यमंत्र्याशी बोलणार आहेत. असे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी 'दैनिक दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
तसेच एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत व महाराष्ट्रातील शेतकरी याआधी मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थितीत अडकलेला होता. तसा दुष्काळाचा सामना शेतकऱ्यास पुन्हा करावा लागू नये आणि यंदा चांगला पाऊस व्हावा असे मागने मी आज घृष्णेश्वर भगवानाकडे मागीतले आहे. अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...