आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पावसातच पितळ पडले उघडे, महावितरणचा आंधळा कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीचे काम करूनही पहिल्याच पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडवली. सिडको, चिकलठाणा, गारखेडा, हर्सूल येथे तास, तर सातारा, बीड बायपास, गोलवाडी, पैठण रोड परिसरातील वीजपुरवठा पहाटे ४.१५ वाजेपर्यंत बंद होता. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
सोमवारी सिडको एन-५, भागात वीज गुल असल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी भरता आले नाही. पिठाच्या गिरणीसह अनेक महत्त्वाचे छोटे-मोठे व्यवसाय बंद होते. वाऱ्याची साधी झुळूक आली तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वादळी वाऱ्याने पैठण रोड पुलाजवळील विद्युत वाहिन्या तुटल्या, तर गोलवाडी परिसरात वाहिन्या एकमेकांत अडकल्या होत्या. नाथ व्हॅलीजवळील इन्सुलेटर फुटले. शहराला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीवर दोन वृक्ष उन्मळून पडले. चिकलठाणा, सिडको भागातही हीच समस्या उद््भवल्याने रविवारी दुपारी ते रात्री ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद होता.
सातारा, बीड बायपास परिसरातील वीजपुरवठा सकाळी वाजता पूर्ववत झाला. त्यामुळे हजारो नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. उकाडा आणि मच्छरांच्या त्रासामुळे झोपमोड झाली.
परिश्रमाने वीजपुरवठा पूर्ववत केला

- वादळीवारे आणि पावसाने सिडको, सातारा आदी ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कार्यकारी अभियंता अर्शद पठाण त्यांच्या पथकांनी अथक परिश्रम घेत वीजपुरवठा सुरळीत केला.
सतीश चव्हाण, मुख्यअभियंता, परिमंडळ