आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: पाच तासांनंतर हार्बर लाइनवर धावली पहिली लोकल, मालगाडीचे घसरलेले डबे हटवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाच तासानंतर हार्बर लाईनवरून पहिली लोकल धावली आहे. आज सकाळी हार्बर मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. घसरलेले डबे हटवण्यात आले असून पाच तासानंतर लोकल वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. सीएसटी ते पनवेल मार्गावरून पहिली लोकल सोडण्यात आली आहे.
 
मुंबईतील हार्बर रेल्वेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले. गर्दीच्या वेळेत हार्बर मार्गावर मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरल्याने सीएसटी ते कुर्ला दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली होती.

प्रवाशांसाठी सीएसटी ते पनवेल रेल्वेलाईनवरील वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. तसेच सीएसटी ते अंधेरी दरम्यानची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मध्य रेल्वेकडून वाशी ते ठाणे अतिरिक्त लोकल सुरू करण्यात आल्या होत्या. तर,  या वेेळेत पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात आली.

मोठ्या प्रमाणात हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकारांचे मात्र हाल झाले. कुर्ला वडाळा आणि वाशी या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. प्रवाशांनी ट्रान्सहार्बर मार्गाचा वापर करावा असे अवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...