आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : अायुक्त मुगळीकरांनी स्वत:हून काढले अतिक्रमण; शेजाऱ्यांचे मात्र ‘जैसे थे’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांच्या मोटारीसाठी उभारलेले शेड स्वत:हून काढून घेतले. - Divya Marathi
मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी त्यांच्या मोटारीसाठी उभारलेले शेड स्वत:हून काढून घेतले.
औरंगाबाद  - ‘शहरातील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी असलेल्या आयुक्तांकडूनच अतिक्रमण’ अशा आशयाचे वृत्त गुरुवारी ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध होताच पालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सिडको एन-८ येथील त्यांच्या निवासस्थानासमोर मोटारीसाठी उभारलेले शेड तातडीने काढून घेतले.
 
मुगळीकर यांचा आदर्श घेऊन आपापल्या मोटारींसाठी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या शेजाऱ्यांनी मुगळीकरांचा हा आदर्श मात्र घेतला नसल्याचे गुरुवारी दिसून आले. मुगळीकर यांचे सिडको एन-८ येथील न्यायालयीन गृहनिर्माण संस्थेत स्वत:चे घर आहे. येथे ते अनेक वर्षांपासून राहतात. घरासमोर ऊन-पावसात मोटार उभी राहत असल्याने मोटारीला सावली देण्यासाठी त्यांनी घरासमोर एक लोखंडी शेड उभारले होते. त्यामुळे तीन ते पाच फुटांपर्यंत रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. त्यांनी शेड उभारल्याचे पाहून सोसायटीतील शेजाऱ्यांनीही तसेच शेड उभारून अंतर्गत रस्ते अरुंद केले होते.
 
मुगळीकर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून आल्यानंतर शहरातील अतिक्रमणे हटवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांच्याच शेजाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’कडे याची तक्रार केली होती. स्वत:च रस्त्याचा श्वास कोंडणारे आयुक्त शहरातील रस्त्यांचा श्वास कसा मोकळा करतील, असा सवाल उपस्थित केला होता.
 
‘दिव्य मराठी’ने मुगळीकर यांच्याकडे विचारणा केली असता ‘मी अतिक्रमण काढून घेतो,’ असे त्यांनी सांगितले होते. दिलेल्या शब्दानुसार त्यांनी गुरुवारी सकाळीच शेड काढून घेत काही दिवसांपूर्वी अनवधानाने झालेली चूक दुरुस्त केली; परंतु त्याच वसाहतीतील त्यांच्या शेजाऱ्यांनी याकडे गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. शेजारी किती दिवसात त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतात की त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ मुगळीकर यांच्यावर येते, याकडे ‘दिव्य मराठी’चे लक्ष असणार आहे.
 
हे पण वाचा, 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...