आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: तुम्ही फुले देता, नागरिकांनी फुले कुठे टाकायची? राठोडांचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा सर्वसााधरण सभेत सीमा खरात यांनी पथदिव्यांच्या विषयावर डीबी स्टार फडकवला. - Divya Marathi
मनपा सर्वसााधरण सभेत सीमा खरात यांनी पथदिव्यांच्या विषयावर डीबी स्टार फडकवला.
औरंगाबाद - स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाकडून वर्तमानपत्रात फोटो छापून आणण्यासाठी नागरिकांना फुले देण्यात येतात. मात्र त्यांची ड्रेनेज लाइन स्वच्छ होत नाही. अनेक भागांत ड्रेनेज लाइन नाही. पाण्याची व्यवस्था नाही. त्यांची कामे करा, तरच ते लोक शौचालयात बसतील. त्यांना फुले देऊन विरोध करता, मग त्यांनी फुले टाकायची कुठे? असा संताप व्यक्त करत प्रमोद राठोड यांनी थेट प्रशासनाला सवाल केला. त्यावर प्रशासनाला काहीच उत्तर देता येत नसल्याचा प्रकार समोर आला. 
 
शनिवारी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. यात प्रशासनाने विषयपत्रिकेत प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेणारी माहिती सादर केली. या वेळी नगरसेविका सीमा खरात, माधुरी अदवंत, कैलास गायकवाड, राज वानखेडे यांनी जेट मशीन मिळत नाही, नागरिकांच्या तक्रारी येऊनही मशीन कमी असल्याने कामे होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर प्रमोद राठोड यांनी थेट प्रशासनावर हल्ला करत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगरचा रेल्वे रुळाच्या परिसरात आपण पाहणी करून शौचाला बसणाऱ्या नागरिकांना आपण शौचालय, पाणी, ड्रेनेज लाइन टाकली आहे का? त्यांना सुविधाच नसेल तर त्यांनी कुठे जावे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनाला काहीच उत्तर देता आले नाही. त्यावर प्रशासनाने तेथे ड्रेनेज लाइन टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जागा संपादन करण्याचा विषयही मार्गी लागत असल्याचे सांगितले. जागा संपादनावरूनही काही वेळ मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि राठोड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यावर मध्यस्थी करून महापौर भगवान घडामोडे यांनी सर्वेक्षण करून ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 

निलंबित अधिकाऱ्यांच्या चौकशीचा ठराव रद्द 
गैर व्यवहार केलेल्या सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यांची विभागीय चौकशी करण्याचा फेरप्रस्ताव आजच्या बैठकीत प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर आणला. मात्र प्रशासनाने यापूर्वीच सादर केलेल्या प्रस्तावाअंती सर्वसाधारण सभेने सर्वांना कामावर रुजू करून घेत चौकशी सुरू करण्याचा ठराव अंतिम केलेला असल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा ठराव रद्दबातल केला. मात्र चौकशीला मान्यता देताना या अधिकाऱ्यांना रुजू करण्याचा घेतलेला निर्णय प्रशासनाला मान्य नसल्याने अगोदरचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवण्यात येईल, असे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. 

पुन्हा रात्रीचे पथक सुरू होणार 
रस्त्यावरअतिक्रमण होत असल्याचा प्रकार मनोज गांगवे यांनीसांगितले.त्यावर पुन्हा रात्रीचे पथक कार्यान्वित करून रस्त्यावर अडचण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे बकोरिया यांनी सांगितले. पाच दिवस अंधारात असलेल्या शहरात भरदिवसा दिवे सुरू असल्याचे सीमा खरात यांनी सांगून आजचा दिव्य मराठी डीबी स्टार बैठकीत फडकवला. 

आयुक्तांची हुकूमशाही चालू देणार नाही 
मुख्य लेखापरीक्षक कुणाच्या अधिपत्याखाली काम करतात? मुख्य लेखापरीक्षकांना मुख्य लेखाधिकाऱ्यांचा पदभार देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत काय? लेखापरीक्षकाने भ्रष्टाचार केला तर त्याचे लेखापरीक्षण कुणी करायचे, अशी प्रश्नांची सरबत्ती करून प्रमोद राठोड, राजू शिंदे यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...