आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा कोट्यधीश उमेदवार महापालिकेच्या रिंगणामध्ये (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कोट्यवधी रुपयांचे बँक बॅलन्स असलेले दहा उमेदवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहे. महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या एकूण ६२६ पैकी तब्बल ५३० उमेदवार लखपती असल्याची माहिती त्यांच्याकडून आयोगाकडे भरून देण्यात आलेल्या शपथपत्रावरुन प्राप्त झाली आहे. 
 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचारासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. रविवार १९ फेब्रुवारीला सायंकाळी प्रचार ताेफा थंड झाल्यानंतर मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी ते सायंकाळी वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया होणार आहे. झोन आणि वगळता उर्वरित पाच झोन मध्ये हे दहा कोट्यधीश उमेदवारांचा समावेश आहे.
 
महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. प्रभागातील अ, ब, जागेतून चार सदस्य निवडून देण्यासाठी नागरिकांना यावेळी चार वेळा मतदान करावे लागणार आहे. 
 
चार जागेसाठी इव्हीएममध्ये असलेली चार बटन दाबल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. एकाद्या जागेवरील कोणालाही मतदान करावयाचे नसल्यास नोटा हे नकारात्मक बटन दाबत नागरिकांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. मताचे मूल्य अमूल्य असले तरी कोट्यवधी-लखोपती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्याच्या प्रभाव मतदारांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
जनतेला पायाभूत सुविधा पूरविण्याची प्राथमिक जबाबदारी महापालिकेची आहे. शहरातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने त्यावर सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. सत्तेच्या खेळात आपण कोठे ही मागे पडू नये म्हणून सर्वच प्रमुख राजकीय पक्षाकडून कोट्यवधी-लखोपती उमेदवारांना उमेदवारी देताना पसंती दिल्याचे यावरुन दिसून येत आहे. निवडणुकीत खर्च करण्याची एैपत नसलेल्या कार्यकर्त्यांला मात्र निष्ठेचे तुनतुने वाजविण्याचे कार्य शिल्ल्क राहिले आहे. निवडणूक झोन क्रमांक आणि मध्ये सर्वाधिक लखोपती उमेदवार असल्याचे दिसून येत आहे. रोकड संपत्तीसह अनेक उमेदवारांकडून स्थावर मालमत्तेची देखील कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीच्या जोरावर मतदारांना भूरळ पाडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे कोट्यधीश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रभागात प्रामुख्याने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. लखोपती उमेदवारांचा आकडा ५३० असल्याने महापालिकेच्या निवडणुकीत धनशक्ती प्रभावी ठरण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे मतदारांचा देखील योग्य उमेदवार निवडूण देण्याकरीता चांगलाच कस लागणार आहे. 

झोन मध्ये सर्वाधिक कोट्यधीश उमेदवारांची संख्या 
महापालिकेच्या झोन अंतर्गत सर्वाधिक कोट्यधीश उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्याखालोखाल झोन क्रमांक मध्ये प्रत्येकी दोन कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले उमेदवार रिंगणात आहे. 

निवडणूक रिंगणातील ३८ जणांकडे कोट्यवधीची स्थावर मालमत्ता 
निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ६२६ पैकी बहुतांश उमेदवार लखोपती असल्याची बाब शपथपत्रांवरून समोर आली आहे. बँकेत असलेल्या कोट्यवधी-लाखो रुपयांच्या रोकड शिवाय ३८ उमेदवारांकडे कोट्यवधी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे दिसून येत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...