आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरांची मध्यस्ती तरीही बांधकाम सभापतीची पुन्हा शिपायास शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजाेगाई - नगरपालिकेतील कर्मचारी - नगरसेवकांचा वाद गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेल्यानंतर दोघांना समज देण्यात आली. परंतु शुक्रवारी सकाळी सुरळीत कामकाज सुरु झाल्यानंतर बारा वाजेच्या सुमारास बांधकाम सभापतीने शिपायाला शिवीगाळ करत नाेकरीवरुन काडुन टाकण्याची धमकी दिली. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठत सभापती विरोधात तक्रार दाखल केली. यामुळे नगर पालिकेतील कामकाजावर मोठा परीणाम झाला आहे. 
 
नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागा जिंकत वर्चस्व सिध्द केले. मात्र नगराध्यक्षा काँग्रेसच्या निवडुन आल्या. नगराध्यक्ष- उपनगाराध्यक्ष या दोघांनी पदभार घेतल्यानंतर खुडचीवरुन दोन्ही काँग्रेस मध्ये चांगलीच जुपली होती. दोन दिवसापुर्वीच कर्मचारी - नगरसेवकात वाद झाल्यानंतर बुधवारी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करुन नगरसेवक त्यांच्या नातेवाईकांच्याया हस्तक्षेपाचा निषेध व्यक्त केला होता. यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना बोलावुन घेतले. यावेळी नगरसेवक कर्मचाऱ्यांनी समज काडुन समन्वय साधत यापुढे वाद होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. नगरसेवक- कर्मचाऱ्यांचा वाद जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्टात गेल्या दुसऱ्याच दिवशी आज दुपारी बारा वाजता बांधकाम सभापती काजी शमिमोद्दीन यांनी आपल्या दालनातील बेल वाजवुन शिपायाला बोलवले. शिपाई दिलीप मस्के बोलावुन ही तु का आला नाही म्हणुन शिवीगाळ करुन नाेकरीवरुन काडुन टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार शहर पोलिसात मस्के यांनी दिली आहे. नगरसेवक-कर्मचाऱ्यांचा वाद शमेना झाला आहे. या वादामुळे गेल्या तीन दिवसापासुन कामकाजावर मोठा परीणाम झाला असुन सामान्य नागरीक कार्यालयाच्या खेटा मारुन बेजार झाले आहेत. पुन्हा लेखणी बंद आंदोलन. कर्मचारी पोलीस स्टेशन कडे तक्रार देण्यास रवाना. सततच्या मानहानीमुळे कर्मचारी वैतागले आहेत. 
 
पृथ्वीराज साठेंची मध्यस्थी 
बांधकामसभापतीने शिपायास शिवीगाळ करुण धमकी दिल्याच्या कारणारुन सर्व कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. माजी आमदार पृथ्वीराज साठे माजी नगराध्यक्ष महादु मस्के यांनी पोलिस ठाणे गाठत कर्मचाऱ्यांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्यात आला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...