आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: निवासी मालमत्तांच्या करात प्रतिचौरस मीटर रुपये 75 पैशांची प्रस्तावित वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिकेची मालमत्ता कराची वसुली ५० टक्क्यांच्याच आसपास राहते. म्हणजेच निम्मे मालमत्ताधारक कराचा भरणा करत नाहीत. जे कर भरतात त्यांनाच दणका देण्याचे महानगरपालिकेने ठरवले असून पुढील आर्थिक वर्षासाठी काही प्रकारात दुप्पट वाढ सुचवली आहे. शुक्रवारी दुपारी स्थायी समितीची बैठक होत असून त्यात दरवाढीला मान्यता देण्यात आली तर एप्रिलपासून नव्या दराने मालमत्ता कर भरावा लागणार आहे. 
 
प्रशासनाने मालमत्ता कराची वसुली वाढवावी, अशी सूचना वारंवार केली जाते. परंतु काही ठिकाणी कराची आकारणीच पालिकेने केलेली नाही तर काही इमारतींना कराच्या नोटिसाही दिलेल्या नाहीत. त्यामुळे मालमत्ता कराची वसुली कमी होत आहे. पालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेने जे कर भरतात त्यांच्याकडूनच जास्तीचे पैसे उकळण्याचे ठरवले असल्याचे प्रशासनाकडून पुढे करण्यात आलेल्या प्रस्तावातून दिसून येते. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, असे वाढले दर (प्रतिचौरस मीटरमध्ये)....
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...