आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: ईश्वर अल्ला तेरो नाम, मनपा को सन्मती दो भगवान, इतिहासप्रेमींकडून मनपाचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक वास्तू पाडून मनपा प्रशासन शहराची ओळखच पुसत आहे. उर्वरित सर्व वास्तूंचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी इतिहासप्रेमी गुरुवारी रस्त्यावर उतरले. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम, मनपा को सन्मती दो भगवान’ अशा घोषणा देत शहरातील दीडशेवर इतिहासप्रेमींनी शहागंज ते बायजीपुऱ्यातील खास गेटवर कँडल मार्च काढत मनपा प्रशासनाचा निषेध केला. 
 
सायंकाळी सात वाजता शहागंज येथील गांधी पुतळ्याजवळ इतिहासप्रेमी जमले. यात औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी इन्टॅक या संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिकांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यसैनिक ताराबाई लड्डा, इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, इतिहास विभागातील प्राध्यापक डॉ. बिना सेनगर, ज्येष्ठ वास्तुविशारद अजय कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 
 
सायंकाळी सात वाजता शहागंजमधील बाजाराच्या गर्दीतून वाटत काढत हा कँडल मार्च निघाला. माइकवरून प्राध्यापक दुलारी कुरेशी या वाटेतील एेतिहासिक स्थळांची माहिती देत होत्या. या अनोख्या कँडल मार्चची चौकशी करत शहागंज ते बायजीपुरा भागातील नागरिकही त्यात सहभागी झाले. 
 
कँडल मार्च खास गेटला पोहोचला तेव्हा त्या दरवाजाचे पडलेले अवशेष पाहून इतिहासप्रेमी गहिवरले. रात्रीतून हे गेट उद्ध्वस्त करून मनपाने काय मर्दुमकी गाजवली? प्रशासनाने न्यायालयाचाही अवमान केला आहे, अशी कॉमेंट्री माइकवरून काही तरुण करत होते. सर्व जण गेटच्या पाडलेल्या ढिगाऱ्यावर चढले. तेथील दगडांवर सर्वांनी आपल्या हातातील मेणबत्त्या लावल्या आणि शहराचा इतिहास नष्ट करणाऱ्या मनपा प्रशासनाचा निषेध करत हा कँडल मार्च विसर्जित केला. 
 
छोटेसे उद्यान आणि हत्तीखानाही होता. निझाम सरकारचे दिवाण चंदुलाल यांनी सर्व मालमत्ता सांभाळली. या भागातील अनेक वास्तू मलिक अंबरने बांधल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले. 
 
शहागंजात होते चार महाल 
कँडल मार्च शहागंज येथे आला तेव्हा डॉ. कुरेशी यांनी सर्वांना या भागातील पुरातन वास्तूंची माहिती दिली. शहागंजमधील घड्याळ, मशिदीचा इतिहास सांगितला. येथेच गगन महाल, राजमहाल, रंगीन महाल आणि रूपमहाल असे चार महाल होते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...