आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : आरोपी नानावर खून; बलात्काराचा गुन्हा, जादूटोण्याचेही लागले कलम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद - रांजणगाव शेणपुंजी परिसरातील दोन बहिणींचे अपहरण करणारा नानासाहेब सोनाजी अभंग हा सराईत गुन्हेगार असल्याचे आढळून आले आहे. त्याने २००१ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात प्रेयसीला सोबत घेऊन तिच्याच पतीचा खून केल्याची घटना पोलिस तपासात पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात तो काही काळ जेलमध्येही होता. बुधवारी त्याला गंगापूर येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अभंग याच्या विरोधात कलम ३६४ (खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरबळीचा प्रयत्न आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासाठी लागणारे कलमदेखील लावण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीने अद्याप गुन्ह्याची कबुली दिलेली नाही. मात्र तपासात सापडलेले मांडूळ, देवीची मूर्ती आणि आरोपीची पार्श्वभूमी पाहता हा नरबळीचाच प्रकार असावा, या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. पोलिस निरीक्षक नाथा जाधव, उपनिरीक्षक आरती जाधव, हवालदार बाळासाहेब आंधळे, रामदास गाडेकर, गोकुळ वाघ यांचे पथक तपास करत आहे. 
 
सराई तगुन्हेगाराच्या ताब्यात होत्या चार दिवस मुली : नानाहा सराईत गुन्हेगार आहे. २००१ मध्ये त्याने प्रेयसीच्या मदतीने तिच्या पतीचा खून केला होता. कोपरगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो काही दिवस जेलमध्येही होता. अपहरणाच्या वेळी त्याने वापरलेल्या दुचाकीवर एमएच २८ पासून सुरू होणारा क्रमांक त्यानेच टाकला. वास्तविक ही गाडी एमएच १७ पासिंगची आहे. त्याच्यावर १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचाही गुन्हा दाखल आहे. अशा सराईत गुन्हेगाराच्या ताब्यातून बारा आणि दहा वर्षांच्या मुली सुटल्या हे सुदैवच आहे. त्याचा आतापर्यंत चार महिलांशी संपर्क असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. 

यामुळे मिळाली पोलिस कोठडी 
आरोपीच्या वाळूज येथील घरात मांडूळ सापडले. ते त्याने कोठून आणले, या गुन्ह्यात त्याला अजून कोणी साथ दिली होती का, ज्या गावांना आरोपी या मुलींना घेऊन गेला होता त्या घटनास्थळांची पाहणी करणे आदी मुद्दे पोलिसांकडून न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यानंतर नानाला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या पोलिस पथकाला २५ हजारांचा रिवॉर्ड देण्यात आला आहे. यात वाळूज एमआयडीसी, गुन्हे आणि सायबर शाखेचा समावेश आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...