औरंगाबाद - कागजीपुऱ्याच्या जंगलात गळा चिरून खून करण्यात आलेल्या महिलेची ओळख पटवण्यासाठी दौलताबाद पोलिसांनी उर्दू आणि मराठीत सुमारे ४ हजार पोस्टर्स छापली आहेत. ती शहर आणि ग्रामीण विभागात वितरित करण्यात येणार आहेत.
मृत महिला ३५ ते ४० वर्षांची असून तिच्या अंगात काळा बुरखा, पांढरा पंजाबी ड्रेस, पायात चैन, गळ्यात पत्ता मणी, हातात अंगठी, हातापायावर मेंदी काढलेली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी तिच्या बोटांचे बायोमेट्रिक्स पद्धतीने ठसे घेऊन ते आधार लिंकशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, बोटे कुजल्यामुळे ओळख पटली नाही. तिचा चेहरा ओळखण्यासाठी पोस्टर छापण्यात आले असून मुंबई येथील बायोमेट्रिक्स तज्ज्ञांशी संपर्क साधणार असल्याचे दौलताबाद पोलिसांनी सांगितले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)