आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्या जल्दी आव, पार्टीने मारके फेका.. म्हणत त्याने सोडले रस्त्यावरच प्राण, आरोपी फरार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड   - भय्या जल्दी आव,पार्टीने मुझे चाकू मारके फेक दिया है, असे म्हणत शेख शकील याने प्राण सोडले. सिल्लोड- अजिंठा रस्त्यावरील पालोद फाट्यावर पेट्रोलपंपासमोरील खड्ड्यात  गुरुवारी रात्री वाहनचालकाचा निर्घृण खून करून  फेकून देण्यात आले. गाडी भाड्याने घेऊन गेलेल्या प्रवाशांनी पालोद फाट्यावर चालकावर चाकूचे वार करून फेकून देत गाडी पळवल्याची घटना घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पळवलेली जीप जळगावहून जप्त केली आहे.   
 
नारेगाव औरंगाबाद येथील चालक शेख शकील शेख शब्बीर( ३४) याचा शुक्रवार दि.१३ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मान व छातीवर वार करीत  त्यास सिल्लोड अजिंठा रस्त्यावर पालोद फाट्यावरील पेट्रोलपंपासमोरील रस्त्याच्या कडेला  फेकून देण्यात आले. त्याच्याजवळील वाहन क्रूझर  जीप (एम.एच.२० इइ ३४८१) घेऊन आरोपी जळगावकडे फरार झाले.
 
जळगावच्या रेल्वेस्टेशन परिसरातील नेहरू चौकात उभी असलेली पळवलेली जीप सिल्लोड पोलिसांनी जप्त केली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व थंड डोक्याने केलेल्या खून प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की,आरोपींनी सोयगाव येथे जाण्यासाठी सदरील जीप भाड्याने एका मध्यस्थामार्फत घेतली. चालक शेख शकील यास सिल्लोड येथून पाच ते सहा जणांना घ्यायचे असे सांगितले. सिल्लोडपासून चौदा  किमी अंतरावरील सिल्लोड -अजिंठा रस्त्यावर असलेल्या पालोद फाट्यावरील पेट्रोलपंपावर क्रूझर जीप रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान थांबविली. बारा ते एक वाजण्याच्या सुमारास शेख शकील याच्यावर विविध ठिकाणी चाकूचे सुमारे १३ वार केले. दरम्यानच्या काळात पेट्रोलपंपावरील पहारेकरी गाडीकडे येत असल्याचे त्यांनी पाहिले. समोरून ग्रामीण पोलिसांची पेट्रोलिंगची गाडीही आली. यामुळे त्यांनी शकील यास पंपासमोरच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकले व जळगावच्या दिशेने निघून गेले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोलिंगच्या जीपने पंपावर रात्री बारा ते सव्वाबाराच्या सुमारास भेट दिल्याची नोंद केली तेव्हा क्रूझर जीप पंपावरील हौदाच्या बाजूला होती. पंपावर रात्री जवळपास तीस ते पस्तीस वाहने असल्याची माहिती आहे.  
 
तोपर्यंत शकील गेला
शकील यास खड्ड्यात फेकल्यानंतर रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान त्याने मालक इम्रानभाई यांना मोबाइल करून घटना सांगितली. त्यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यांनी ग्रामीणच्या नियंत्रण कक्षाला माहिती देण्याचे सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर रात्री अडीच ते पावणेतीनच्या सुमारास सिल्लोड ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहाेचले. तोपर्यंत शकील मरण पावला होता.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, ...तर वाचले असते शकीलचे प्राण 
बातम्या आणखी आहेत...