आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद - नोकरीसाठी न्यायालयात भांडणाऱ्या, शिक्षकाचा निकालाच्या दिवशीच दत्तात्रय पोकळे खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे स्थानकावर आढळलेला मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता. - Divya Marathi
रेल्वे स्थानकावर आढळलेला मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला होता.
औरंगाबाद/ जालना- अनुदान प्राप्त होताच शैक्षणिक संस्थेने शिक्षकाला कामावरून कमी केले. न्यायासाठी तो दोन वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढत होता. त्याचा बुधवारी निकालही लागणार होता. मात्र, तत्पूर्वीच या िशक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी दगडाने ठेचून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तोंडावर अॅसिड टाकून जाळण्याचा तसेच शरीराचे तुकडे होण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळांवर फेकून दिला. ही घटना शहरातील रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारजवळ बुधवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. दत्तात्रय पोकळे (४३, रा. शिंदेवडगाव, ता. घनसावंगी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. 

पोकळे हे घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील म. फुले विद्यालयात शिक्षक होते. दहा वर्षे त्यांनी सेवा केली. संस्थेला अनुदान प्राप्त होताच त्यांना नोकरीवरून कमी केल्यामुळे पोकळे यांनी खंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने पोकळे यांच्या बाजूने निकाल देऊनही संस्था चालकाने त्यांना रुजू करून घेतले नाही. त्यामुळे पोकळे यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या तारखेसाठी पोकळे मंगळवारी सायंकाळी जालन्यावरून औरंगाबादला आले होते. परंतु मंगळवारी मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटेच त्यांचा औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या ‘डेड एंड’कडे असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचजवळ त्यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती कळताच रेल्वे तसेच वेदांतनगर चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण केले. पोकळे यांची कागदपत्रे रुमालाचा वास घेतल्यावर श्वान जागीच घुटमळले. 

कागदपत्रांची पिशवी पैसे आढळले
पोकळेयांच्या मृतदेहाजवळ सोबत आणलेली न्यायालयीन कागदपत्रांची पिशवी तसेच काही पैसे आढळले. प्लॅटफॉर्म क्रमांक चार हे निर्मनुष्य ठिकाण आहे. तेथेच पोकळे यांचा दगड आणि फरशीने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे व्हावेत या हेतूने त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर ठेवण्यात आला होता. 

महिनाभरात दुसरा खून
रेल्वेस्थानकपरिसरात महिनाभरात दुसरा खून झाला आहे. १० जानेवारीला मालधक्का परिसरातील झुडपात चौदावर्षीय युसूफ जोसेफ कांबळे (१४, रा. राजीव गांधीनगर, स्टेशन परिसर) याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. अद्याप त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. रेल्वेस्थानकाचा हा परिसरा रात्री निर्मनुष्य असतो. पथदिवे नसल्याने तेथे अंधार असतो. रेल्वे पोलिसांची या परिसरात गस्त नसल्याने अनेकदा येथे तरुण नशा करताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 
 
मंगळवारीमध्यरात्री किंवा बुधवारी पहाटेच त्यांचा औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या ‘डेड एंड’कडे असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचजवळ त्यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती कळताच रेल्वे तसेच वेदांतनगर चौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकालाही पाचारण केले. पोकळे यांची कागदपत्रे रुमालाचा वास घेतल्यावर श्वान जागीच घुटमळले. 

कागदपत्रांची पिशवी पैसे आढळले
पोकळेयांच्या मृतदेहाजवळ सोबत आणलेली न्यायालयीन कागदपत्रांची पिशवी तसेच काही पैसे आढळले. प्लॅटफॉर्म क्रमांक चार हे निर्मनुष्य ठिकाण आहे. तेथेच पोकळे यांचा दगड आणि फरशीने ठेचून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे व्हावेत या हेतूने त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर ठेवण्यात आला होता.
 
महिनाभरात दुसरा खून
रेल्वेस्थानकपरिसरात महिनाभरात दुसरा खून झाला आहे. १० जानेवारीला मालधक्का परिसरातील झुडपात चौदावर्षीय युसूफ जोसेफ कांबळे (१४, रा. राजीव गांधीनगर, स्टेशन परिसर) याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. अद्याप त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. रेल्वेस्थानकाचा हा परिसरा रात्री निर्मनुष्य असतो. पथदिवे नसल्याने तेथे अंधार असतो. रेल्वे पोलिसांची या परिसरात गस्त नसल्याने अनेकदा येथे तरुण नशा करताना दिसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 
 
टेलरिंगचे काम करून नोकरीसाठी पैसे भरले 
पोकळेंच्यानातलगांनी दिलेल्या माहितीनुसार पोकळे यांनी शिंदेवडगावात टेलरिंगचे काम करून बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नंतर पानेवाडी येथील महात्मा फुले शिक्षण विद्यालयात नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी शेतजमिनीचा काही भाग विकून आत्माराम तिडके यांच्या शिक्षण संस्थेत आठ ते दहा लाख रुपये भरले होते. तेव्हा शाळेला अनुदान नव्हते. परंतु काही वर्षांपूर्वी शाळेला अनुदान मिळताच पोकळे यांना कामावरून काढून टाकण्यात आले. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...