आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MY FM ‘पैसो का पेड’च्या ऑडिशन्समध्ये औरंगाबादकरांनी उलगडली विविध गुपिते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज ऑडिशन्सचा शेवटचा दिवस - Divya Marathi
आज ऑडिशन्सचा शेवटचा दिवस
औरंगाबाद - ९४.३ माय एफएम आणि बुलडाणा अर्बनतर्फे आयोजित ‘पैसो का पेड’ या रेडिओ रिअॅलिटी शोसाठी शनिवार, १२ ऑगस्ट रोजी प्रोझोन मॉल येथे हजारो औरंगाबादकरांनी ऑडिशन दिल्या. सकाळी ११ वाजेपासून ऑडिशनला सुरुवात झाली. सकाळपासून तरुणांनी रांगेत उभे राहून ऑडिशन दिल्या. जिंकणाऱ्याला लाख रुपये मिळणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, पण हे लाख रुपये मिळाल्यानंतर त्याचे नेमके करणार काय, या प्रश्नावर अनेक औरंगाबादकरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोणाला आपल्या आई-वडिलांना तीर्थयात्रेला न्यायचे आहे, तर कोणाला पुढचे शिक्षण करायचे आहे. काहींना घर घ्यायचे आहे, तर कोणाला आपल्या मुलीला शिकवायचे असल्याचे सांगितले. 
 
‘पैसो का पेड’च्या ऑडिशन्समध्ये औरंगाबादकरांनी खूप धमाल केली. वयाचे सगळे बांध तोडून अाबालवृद्ध, स्त्री- पुरुष आणि तरुणांनी ‘पैसो का पेड’च्या ऑडिशन्सचा आनंद लुटला. कोणी अभिनय, कुणी डान्स, तर कुणी गाणे म्हणून दाखवले. भावभावनांचा आणि मनोरंजनाचा हा “पैसो का पेड’ अजून काय काय करवून घेणार आहे याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. शनिवारप्रमाणेच रविवार, १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून “पैसो का पेड’च्या ऑडिशन्स सुरू राहतील. अधिक जाणून घेण्यासाठी ऐकत राहा ९४.३ माय एफएम आणि वाचत राहा दिव्य मराठी. 
 
3 लाख रुपये जिंकण्याची तिसरी पायरी 
रविवारी ‘पैसो का पेड’च्या ऑडिशन्सला प्रोझोन मॉल येथे सामोरे जा आत्मविश्वासाने आणि जिंका जजेसची आणि तुमच्या सहस्पर्धकांची मनेसुद्धा. 
बातम्या आणखी आहेत...