पैठण - शहरासह जायकवाडीच्या परिसरात बुधवारी दुपारी ३.३५ वाजेच्या दरम्यान मोठा गूढ आवाज झाला. मागील वर्षी चार ते पाच वेळा याच पद्धतीने गूढ आवाज झाले. या आवाजाचे गूढ रहस्य शोधण्यासाठी मागील वर्षी नागपूर येथील भूगर्भ विभागाच्या एका पथकाने जायकवाडीसह पाटेगाव या भागातील मातीचे नमुने तपासले होते.