आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार मुख्यमंत्री प्रभावीपणे राबवत आहेत, महानोरांकडून योजनेचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - जलयुक्त शिवार योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रभावीपणे राबवत असून त्यांनी शेती आणि जलसंधारण ऐरणीवर आणले. त्यांच्या मंत्रिमंडळातील दहा मंत्री जर खंबीरपणे पाठीशी उभे राहिले तर शेतीचे चित्र पालटण्यास वेळ लागणार नाही, असे मत ना. धों. महानोर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत व्यक्त केले.

अमृतमहोत्सवानिमित्त ना. धों. यांनी लिहिलेल्या ‘विधिमंडळातून ना. धों. महानोर’ पुस्तकाचे प्रकाशन पळसखेडा येथील फार्महाऊसवर एका कौटुंबिक कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते झाले. शेतीशी असलेली नाळ आणि प्रभावी साहित्य यामुळे महानोर व पळसखेडा मराठी माणसाच्या अंत:करणात असल्याचे गौरवोद््गार शरद पवार यांनी काढले. उर्वरित आयुष्य शेतकरी व साहित्यासाठी घालवणार असल्याचे महानोर म्हणाले. महानोरांनी पहिले पुस्तक शरद पवार यांना, दुसरे जैन उद्योग समूहाचे अशोक जैन यांना दिले. तिसरे मुख्यमंत्र्यांना पाठवले. व्यासपीठावर आ. सतीश चव्हाण, अशोक जैन आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...